जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या वतीने निवारा सोसायटीत दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळा या ठिकाणी रविवार दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले असुन शिबीरामध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन,सल्ला व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी दिली आहे.

“या शिबिरामध्ये तपासणी करुन आवश्कता असल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रीया देखील केली जाणार आहे.यात मेंदू,दात,हदय विकार,डोळे,आदी सर्व रोगांचे निदान करुन आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीया केली जाणार आहे”-कलविंदर दडियाल.अध्यक्ष कोपरगाव शहर शिवसेना.

हे शिबिर रविवार दिनांक १२सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.या शिबिराचे उदघाटन शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते होणार अाहे.या शिबिरासाठी तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,डॉ. जिया शेख,आयुर्वेद,दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,माजी नगरसेवक दिनार पद्मकांत कुदळे,भरत मोरे शहराध्यक्ष एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,संघटक अस्लम शेख,श्री जी कम्युटरराईज ब्लड लॅबचे संचालक डॉ.नरेंद्र भट्टड,शिवसेना वाहतुक सेनेचे जिल्हा प्रमुख ईरफान शेख,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या शिबिरामध्ये तपासणी करुन आवश्कता असल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रीया देखील केली जाणार आहे.यात मेंदू,दात,हदय विकार,डोळे,आदी सर्व रोगांचे निदान करुन आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीया केली जाणार आहे.

सदर प्रसंगी डाॅ.अमित नाइकवाडे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.शंशाक तुसे,डाॅ.निरज काळे,हदय शस्त्रक्रीया तज्ञ,डाॅ.तेजश्री चव्हाण (नाईकवाडे),नेत्ररोग तज्ञ,डाॅ.विशाल काळे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.पूजा कातकडे,डाॅ.तुषार सांळुके,डाॅ.प्रशांत सगळगीळे,डाॅ मयूर गंगवाल आदी तज्ञ डाँक्टर उपस्थित राहाणार आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close