आरोग्य
कोळपेवाडीत कोरोना शिबिर उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका आरोग्य विभागाच्या वतीने कोळपेवाडी येथे कोरोना आर.टी.पी.सी.आर तपासणी आणि रॅपिड तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे.त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात आज पर्यंत १८६ रुग्णाचे बळी गेले आहे.कोरोनाचे नवीन रुग्ण कमी झाले असले तरी वाढणारेबळी मात्र चिंताजनक आहे.या पार्श्वभुमीवर तालुका आरोग्य विभागाने गावोगावी जाऊन कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.कोळपेवाडी येथे नुकताच असे शिबिर संपन्न झाले आहे.
राज्यात आज तर २१,२७३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ३४,३७० कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ४२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण ०३ लाख,०१ हजार ०४१,सक्रिय रुग्ण आहेत.आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ४२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ४६ हजार ८९६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १३ हजार ८०४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ३० हजार १५५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ९३४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात आज पर्यंत १८६ रुग्णाचे बळी गेले आहे.कोरोनाचे नवीन रुग्ण कमी झाले असले तरी वाढणारेबळी मात्र चिंताजनक आहे.या पार्श्वभुमीवर तालुका आरोग्य विभागाने गावोगावी जाऊन कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.कोळपेवाडी येथे नुकताच असे शिबिर संपन्न झाले आहे.त्यासाठी सरपंच सुर्यभान कोळपे यांनी ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांचेसह शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे.आरोग्य विभाग पंचायत समिती कोपरगाव यांचेतर्फे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी जाऊन नागरिकांची कोरोना तपासणी करत आहेत.या सर्व शिबिरांसाठी गावचे सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक,शिक्षक,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य यांचे मोठे योगदान मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी झाल्यामुळे कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात येतात.परिणामी या रुग्णांमुळे होणारा प्रसार थांबविता येतो.प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा,अंगणवाडी सेविका हे मेहनत घेत असल्याचेही डॉ.विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.