जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना साथीने चौघांचा मृत्यू,तर बाधित रुग्ण संख्या मोठी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे १५० श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ४६ अँटीजन तपासणीत ८२,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ५९ असे एकूण अहवालात एकूण १८७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १५३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात दोन मृत्यू झाले असून त्यात येवला रोड येथील एक ५३ वर्षीय महिला तर दत्तनगर येथील २० वर्षीय तरुणाचा समावेश आहे तर तालुक्यातील ओगदी येथील एक पुरुष वय-३८ वर्षीय पुरुष व सुरेगाव येथील ४७ वर्षीय इसम आदींचा समावेश आहे.

दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून त्यात तरुणांचा भरणा मोठा असल्याने उद्या वय वर्ष १८ ते ४५ साठी शासनाने आपली भूमिका बदलली असून उद्या दि.६ मे पासून त्यांच्यासाठी लस देण्यास प्रारंभ केला आहे.त्यासाठी शहरातील नागरिकांसाठी हि सुविधा उपलब्ध केली आहे.त्यामुळे या नागरिकांनीच लस घेण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी ०९ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत यावे दुसरी लस घेणाऱ्यांनी येऊ नये असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी केले आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ८४ हजार ३५१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ६५७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ६१ हजार ५५६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार १३७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात सहसकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close