आरोग्य
कोपरगावात कोरोना साथीने चौघांचा मृत्यू,तर बाधित रुग्ण संख्या मोठी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून त्यात तरुणांचा भरणा मोठा असल्याने उद्या वय वर्ष १८ ते ४५ साठी शासनाने आपली भूमिका बदलली असून उद्या दि.६ मे पासून त्यांच्यासाठी लस देण्यास प्रारंभ केला आहे.त्यासाठी शहरातील नागरिकांसाठी हि सुविधा उपलब्ध केली आहे.त्यामुळे या नागरिकांनीच लस घेण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी ०९ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत यावे दुसरी लस घेणाऱ्यांनी येऊ नये असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ८४ हजार ३५१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ६५७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ६१ हजार ५५६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार १३७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात सहसकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.