जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पंचायत समिती १२ गण व जिल्हा परिषद ६ गटांची आरक्षण सोडत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांची व जिल्हा परिषदेच्या ६ गणांची आरक्षणाची सोडत २८ जूलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे‌.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार ही सोडत काढली जाणार आहे. पंचायत समितीच्या १२ गणांसाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बालाजी क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली जाणार आहे.

२८ जुलै रोजी ६ जिल्हा परिषद गटांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढली जाणार आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नागरिक व पदाधिकारी यांनी आरक्षण सोडतींसाठी उपस्थित राहावे असे आवाहन ही विजय बोरूडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close