जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोना वाढ थांबणार कशी ?

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १३ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या ९४ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये २२ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ७२ संशयीतांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर १४ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून नगर येथील तपासणीत दोन रुग्ण बाधित आले आहे.तर खाजगी प्रयोग शाळेत तीन बाधित आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या २७ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान काल कोरोना वाढीपेक्षा कोरोना मुक्तीचे प्रमाण आज वाढले असले तरी जबाबदार नागरिकांचे निधन हि मनाला चटका लावणाऱ्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ३४२ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३२ लाख ३९ हजार ०९६ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५९ हजार ६४५ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ०३ हजार ८२३ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २२ हजार ७९४ वर जाऊन पोहचला आहे.

दरम्यान आज आढळलेल्या बाधित रुग्णांत शहरातील १७ रुग्ण असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० असे एकूण कोरोना बाधित रुग्ण २७ आढळले आहे.त्यात शहरातील गांधीनगर येथील ३६ वर्षीय पुरुष,संभाजी चौक येथील पुरुष (वय-२५),पंचायत समिती समोर पुरुष (वय-३३),सुभद्रानगर येथील दोन बाधित अरुग्ण आढळले असून त्यात पुरुष (वय-२९), तर महिला (वय-७५ )आहे.गिरमेचाळ येथील पुरुष (वय-३७) येवला रोड येथील पुरुष (वय-२२),शिवाजी रोड येथील पुरुष (वय-३१), तर महिला (वय-३२) आहे.या शिवाय यशवंत चौक येथील तरुण (वय-१७),संजयनगर येथील पुरुष (वय-७२),समतानगर येथील तरुण (वय-२०),आदीं १३ रुग्णाचा समावेश आहे.

तर तालुक्यातील कोळपेवाडी येथील पुरुष (वय-४५),धारणगाव येथील मुलगा (वय-११),तर मुलगी (वय-९) तर महिला (वय-३४) असे तिघे बाधित रुग्ण आढळले आहे.तर शहाजापूर येथे पुरुष (वय-३२),टाकळी येथील तरुण (वय-३२),टाकळी येथील पुरुष (वय-४१),चासनळी येथील महिला (वय-५४),लौकी येथील पुरुष (वय-४८), धामोरी पुरुष (वय-४२) आदी नऊ जणांचा समावेश आहे.

या शिवाय खाजगी प्रयोग शाळेचा अहवाल आले असून पंचायत समिती समोरील राहणारे खाजगी लॅबमधील एक ४५ वर्षीय महिला,४७ व ८६ वर्षिय पुरुष,आदींचा समावेश आहे.तर नगर येथील तपासणीत निवारा येथील ३० वर्षीय पुरुष,तर ब्राम्हणगाव येथील ६३ वर्षीय पुरुष आदी पाच जणांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १७ हजार २९२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २४४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १७ तर ग्रामीण भागात १० असे २७ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे जनता टाळेबंदीची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७३६ इतकी झाली आहे.त्यात १८९ रुग्ण सक्रिय आहेत,तर काल एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९० टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ४७७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १३ हजार ४८५ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.०६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ५३३ इतकी झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close