जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात बिबट्या आढळला,२३ हजारांचे गोधन फस्त

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत नुकताच बिबट्या आढळला असून त्याने गोदावरी काळव्यानाजीक असलेल्या गणपती मंदिराजवळ असलेल्या जाधव वस्तीवर एक बोकड व सहा महिन्याची कालवड असे २३ हजारांचे पशुधन फस्त केल्याची धक्कादायक माहिती शेतकरी अजय गोरक्षनाथ जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

काल येसगावात मध्यरात्री जाधव वस्तीवर साडे बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे.मध्यरात्री शेळ्या व गायी बांधलेल्या गोठयात अचानक धडपड व शेळ्यांचा आवाज आल्याने या शेतकऱ्यास जाग आली व त्यांनी घराबाहेर येऊन पहिले असता त्यानां आपल्या गोठ्यात एक पंधरा हजार रुपये किंमतीची कालवड व एक आठ हजार रुपये किमतीचा बोकड बेपत्ता असल्याचा आढळला आहे.

कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा संचार अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कुंभारी,धारणगाव,टाकळी, जेऊर कुंभारी आदी ठिकाणच्या बातम्या वारंवार कानावर पडत असताना काल येसगावात मध्यरात्री जाधव वस्तीवर साडे बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे.मध्यरात्री शेळ्या व गायी बांधलेल्या गोठयात अचानक धडपड व शेळ्यांचा आवाज आल्याने या शेतकऱ्यास जाग आली व त्यांनी घराबाहेर येऊन पहिले असता त्यानां आपल्या गोठ्यात एक पंधरा हजार रुपये किंमतीची कालवड व एक आठ हजार रुपये किमतीचा बोकड बेपत्ता असल्याचा आढळला त्यांनी विजेरी घेऊन आजूबाजूस शोध घेतला असता त्यांना बोकड मृत अवस्थेत आढळला आहे.व पुढे बिबट्याचा काही अंतरावर असलेला दिसून आला आहे.त्यांनी सावधपणा दाखवत तातडीने कुटुंबातील बाकी माणसांना जागे करत आपल्या शेळ्या व गोधन सुरक्षित जागेवर हलविले व शोध घेतला असता त्याना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले.त्या नंतर त्यांनी भीतीने घर बंद करून घेतले असता सकाळी पुन्हा शोध घेतला असता त्याना मृत कालवड व बोकड बेपत्ता आढळून आले.त्यांनी या बाबत आधी गावात ग्रामपंचायत व नंतर कोपरगावात वनीकरण विभागास कळवले आहे.

दरम्यान या बिबट्याने येसगावात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे व शेतकऱ्यांनी या भागातील बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close