जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात पुन्हा २३ रुग्णांची मोठी वाढ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत आठ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या १०९ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये २३ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ८६ संशयीत्यांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर १३ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून करंजीतील एक वगळता सर्व बावीस रुग्ण कोपरगावातील असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ५३२ इतकी झाली आहे.त्यात १६१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.५० टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ६२६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १० हजार ५०४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.२५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३६३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६८.२३ टक्के झाला आहे.

दरम्यान आज आढळलेल्या बाधित रुग्णांत कोपरगाव शहरात राजपाल सोसायटीतदोन पुरुष (वय-४९,५६०,व एक स्त्री (वय-५४),संजयनगर ३ पुरुष (वय-४,६,११) अधिक दोन स्रिया (वय-५४ व १४) टाकळी नाका तीन पुरुष (वय-३९,१६,१२ ) शिवाजी रोड एक पुरुष (वय-५८),श्रद्धा नगरी दोन स्रिया (वय-३२ व २७ ) यशवंत चौक एक पुरुष (वय-४९) गांधीनगर पुरुष (वय-५३) व अन्य एक कोळपेवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.तर ग्रामीण भागात करंजीत एक २८ वर्षीय स्त्री चा समावेश आहे.आज नवीन रुग्ण आढळण्याचा वेग काही अंशी कमी आला आहे त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.व नागरिकांनी आता हि साथ कमी होईपर्यंत शहर बंद करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close