कोपरगाव तालुका
महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल,आरोपी अटक तर एक फरार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दत्त नगर परिसरात राहणारी व खाजगी नोकरी करणाऱ्या एक अल्पसंख्याक महिलेचा त्याच समाजातील आरोपी फारूक अजीज शेख व फारूक फकीर शेख दोघे रा.दत्तनगर कोपरगाव यांनी विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असून साक्षिदार यास लाकडी काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केले असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून त्यांनी साक्षिदार यास मारहाण करून पोबारा केला आहे.यातील पहिल्या क्रमांकाचा आरोपी पोलिसानी जरबंद केला असून त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला व आरोपी हे कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात जवळजवळ राहतात.आरोपीनी दत्तनगर येथील सार्वजनिक स्थळ असलेल्या गणेश मंदिरासमोर रोडवर या आपदग्रस्त महिलेशी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व साक्षिदार यास लाकडी काठीने डोक्यात मारून जखमी केले आहे.व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला व आरोपी हे कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात जवळजवळ राहतात.आरोपीनी दत्तनगर येथील सार्वजनिक स्थळ असलेल्या गणेश मंदिरासमोर रोडवर या आपदग्रस्त महिलेशी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व साक्षिदार यास लाकडी काठीने डोक्यात मारून जखमी केले आहे.व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.असून घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे.
शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.५३३/२०२० भा.द.वि.कलम.३५४(अ),(ड),३२४,५०४,५०६,३४ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.