जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महसूलच्या ताब्यातून ट्रॉलीची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सामान्य नागरिकांच्या चोऱ्या होणे हि बाब पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांसाठी किरकोळ बाब गणली जाते मात्र जेंव्हा महसूल विभागाच्याच ताब्यात असलेले व जप्त केलेले वाहन चोरी होते हि बाब मात्र असामान्य व प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण करणारी व धाक राहिला नसल्याची ठरण्यास हरकत नसावी.अशी घटना नुकतीच उघड झाली असून कोपरगाव महसूल अधिकाऱ्यांच्याच वाळूचा जप्त केलेला व धान्य गोदामात लावलेला ट्रॅक्टर-ट्रेलर नुकताच चोरी गेला असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव महसुलच्या ताब्यात वाळूचोरीचे अनेक वाहने आहेत.गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंध असतानाही कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो हि बाब लपून राहिलेली नाही.यात महसूल विभाग आघाडीवर आहे.यात वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याची बाब लपून राहिलेली नाही.मध्यन्तरी कुंभारी येथील तलाठी असेच वाहन सोडून देण्याच्या नादात लाच घेताना पकडले आहे.

कोपरगाव महसुलच्या ताब्यात वाळूचोरीचे अनेक वाहने आहेत.गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंध असतानाही कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो हि बाब लपून राहिलेली नाही.यात महसूल विभाग आघाडीवर आहे.यात वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याची बाब लपून राहिलेली नाही.मध्यन्तरी कुंभारी येथील तलाठी असेच वाहन सोडून देण्याच्या नादात लाच घेताना पकडले आहे.यात महसुलचे कर्मचारी कधीतरी एखादी कारवाई करून आपण दक्ष असल्याचा आव आणला आणतात मात्र ते हिमनगाचे एखादे टोक असते हि बाबही सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे.यात महसुली अधिकारी व त्यांचे खालील कर्मचारी कसे गुंतलेले असतात याच्या रंजक कहाण्या हप्ते देणारे वाळूचोर आणि उघड्या डोळ्यांनी वाळूचोरी पाहणारे ग्रामस्थ सांगत असतात. हप्ते कसे आणि कोठे दिले जातात.यात सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नगरसेवक व ग्रामीण भागातील काही कार्यकर्ते कसे सामील करून घेतले जातात व त्यांना कशा दलाल्या दिल्या जातात.महसुली अधिकारी आपल्या बदल्या नदीकिनारी विशेषतः गोदावरी काठच्या तालुक्यात करून घेण्यासाठी कशी मोठी माया वरिष्ठ पातळीवर मंत्री व अधिकारी यांना वश करून देतात व इच्छित ठिकाणी कशी बदली करून घेऊन कसा मोठा नफा कमावतात हे हि लपून राहिलेले नाही.मात्र कधीतरी कारवाईचे नाटक करून केलेल्या कारवाईत जप्त केलेले वाहन नीट यांच्या ताब्यात सुरक्षित राहत नाही हि बाब धक्कादायक रित्या उघड झाली आहे.अनेक वाहनांचे तर चाके,टायर,अन्य सुटे भाग अनेक वाहांनाना आढळत नाही याची स्वतंत्र चौकशी केली तर भलतेच प्रकरण उपस्थित होण्याचा धोका आहे.अनेक क्षतिग्रस्त वाहने तहसील,जलसंपदा विभाग गोदामे आदी ठिकाणी आढळून येतील.कोपरगावात धान्य गोदामातून नुकतीच अशा एका ट्रॅक्टरच्या निळ्या रंगाच्या ट्रेलरची चोरी उघड झाली असून या बाबत तक्रारदार प्रकाश विठ्ठल तोगरवार (वय-२५) धंदा वर्तमानात कोपरगाव तहसील कार्यालयात गौण खनिज लिपिक तथा तलाठी असलेले यांनी नुकताच अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.५३२/२०२० भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्याची किंमत २० हजार रुपये दर्शवली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.शरद गायमुखे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close