जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्णांची मोठी वाढ,दोघांचे निधन !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग दोन दिवस कोरोना वाढीचा दर वाढला असताना काल पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने २१ रुग्णांचा उच्चान्क गाठला होता तर आज पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा कोरोना ९५ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा ३३ ने वाढला झाली असून काल नाशिक येथे पाठलेल्या एका श्रावांचा तपासणी अहवाल आला असून त्यात एक ४७ वर्षीय महिला बाधित आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे.तर चांदेकसारे येथील ५७ वर्षीय महिला व कोपरगाव टाकली नाका येथील ७५ वर्षीय पुरुष असे दोघांचे निधन झाले आहे.

कोपरगाव शहरात २७ रुग्ण तर ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश असून त्यात देर्डे येथील ७४ वर्षीय पुरुष,शहाजापूर येथील २५ वर्षीय स्त्री,ब्राम्हणगाव येथील २७ वर्षीय पुरुष,सुरेगाव येथील ५५ वर्षीय स्त्री, जेऊर कुंभारी येथील ३७ वर्षीय स्त्री,तर संजीवनी कारखाना येथील एक ५९ वर्षीय पुरुष बाधित आले असल्याची माहिती हे तर ६३ रुग्ण निरंक आले आहे.याशिवाय आज ७ रुग्ण बरे होऊन त्यानां घरी सोडून देण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०३ हजार ९८६ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २६ लाख ५१ हजार २९० वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५१ हजार ०७९ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ९५ हजार ८६५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २० हजार ०३७ वर जाऊन पोहचला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ८१६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १३९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.

आज आलेल्या अहवालात सप्तर्षी मळा एक ४३ वर्षीय पुरुष,गजानननगर येथील ३५ वर्षीय पुरुष,सुभद्रानगर येथील ५० वर्षीय पुरुष,टिळकनगर येथील तीन महिला (वय-४२,९,६७) तर बँक रोड येथील ४४ वर्षीय पुरुष,खडकी येथील ५९ वर्षीय पुरुष,निवारा येथील एक २७ वर्षीय पुरुष तर ७५ वर्षीय महिला,धारणगाव रोड येथील ५३ वर्षीय पुरुष,तर ४५ वार्षिय महिला,दत्तनगर येथील २५ वर्षीय पुरुष,गांधीनगर येथील ४२ वर्षीय पुरुष,विवेकानंदनगर येथील ६० वर्षीय महिला तर तीन वर्षीय बालक,टाकळी रोड येथील ८४ वर्षीय महिला,कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ ३३ वर्षीय पुरुष,२५ आणि ६८ वर्षीय महिला,राम मंदिर येथील ५६ वर्षीय पुरुष,पोलीस कॉलनी येथील ४७ वर्षीय पुरुष व १९ वर्षीय तरुण व ८७ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.तर यशवंत चौक येथील ४९ वार्षिय पुरुष व १९ वर्षीय तरुण,अशा शहरातील २७ जणांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४५७ इतकी झाली आहे.त्यात ११९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.०५ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ३८७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार ५४८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.०१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३३१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७२.४२ टक्के झाला असल्याची माहितीही डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close