कोपरगाव तालुका
दुग्ध व्यवसाय वाचविण्यासाठी १० रु.अनुदान द्या-मागणी
जनशक्ती न्यूज
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दुग्धव्यवसायावर दिवसेंदिवस विपरित परिणाम होत आहे. बाजारपेठेतील पॅकींग दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तसेच बाजारपेठेतील पावडरचे दर देखील कमी होत आहेत.मुळात दुग्धव्यवसाय हा अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार,अल्पबचत गट यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. दुग्धव्यवसाय मोडकळीस आल्यास उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो-राजेश परजणे
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की,”महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई (महानंदा ) यांच्यामार्फत सहकारी संघांकडून दूध रुपांतरासाठी घेण्यात येत होते.मात्र एकूण संकलनाच्या अतिशय नाममात्र प्रमाणात खरेदी केले जात आहे.तेही दि.२७ जुलै पासून बंद करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत शासनाने दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दूध दराप्रमाणे सर्व दुधावर दर द्यावा लागत आहे.त्यामुळे संघांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती कोरोना महामारीच्या संकटामुळे अतिशय अडचणीची व
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दुग्धव्यवसायावर दिवसेंदिवस विपरित परिणाम होत आहे. बाजारपेठेतील पॅकींग दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तसेच बाजारपेठेतील पावडरचे दर देखील कमी होत आहेत.मुळात दुग्धव्यवसाय हा अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार,अल्पबचत गट यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. दुग्धव्यवसाय मोडकळीस आल्यास उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होवून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिणाम होवू शकतो,यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादित सर्व दूधावर प्रतिलिटर १० रुपये प्रमाणे अनुदान मिळावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री राधाकृष्ण विखे,दुग्ध विकास मंत्री,जिल्हाधिकारी कोपरगावचे तहसीलदार आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर दूध उत्पादक शेतकरी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील,राजेंद्र जाधव,ज्ञानदेव गुडघे,जयराम पाचोरे,भागवतराव धनवटे,उत्तमराव माने,भाऊसाहेब कदम,यशवंतराव गव्हाणे,गोपीनाथ केदार,सुनील खालकर,राजेंद्र निकोले,ज्ञानदेव शेळके,सुदामराव शिंदे,गोरखनाथ शिंदे,आंबादास वराडे, लक्ष्मणराव शिंदे,नानासाहेब गवळी,शफिलाल सय्यद,प्रभाकर घाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.