जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आज २१ जणांची सुटका तर बाधित रुग्ण घटले

जाहिरात-9423439946

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण ३२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात ८ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात अंचलगाव येथील तीन रुग्ण बाधित आढळले असून त्यात १८ व २० वर्षीय युवक तर ५० वर्षीय महिला यांचा समावेश आहे तर कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील एक ४८ वर्षीय महिला,ब्रिजलालनगर येथील ३४ वर्षीय पुरुष गांधीनगर येथील २० वर्षीय तरुण तर पोहेगाव येथील एक २५ वर्षीय तरुण व झगडेफाटा येथील एक १९ वर्षीय तरुणी यांचा समावेश असल्याची माहिती माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान २४ नागरिकांचे अहवाल आज निरंक आले आहे.या खेरीज सहा अहवाल नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.आता बाधित रुग्णांची संख्या ३४२ झाली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १५६ आहे.आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.तर उपचारानंतर १८२ जण दुरुस्त झाले आहे

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात काल विक्रमी ८ रुग्ण आढळले होते त्या खालोखाल सोनारी व ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी २ रुग्ण बाधित आढळले होते तर चांदेकसारे,येसगाव,टाकळी, येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला असून कोपरगाव शहरात जानकीविश्व व सुभद्रानगर येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळल्याने कोपरगाव व तालुक्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले असताना आज सकाळी पुन्हा त्यात दत्तनगर येथील ३४ वर्षीय पुरुष तर भामा नगर येथील ३४ वर्षीय पुरुष असे दोन जण बाधित निघाले होते.त्या नंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे आठ अहवाल प्राप्त झाले आहे.दरम्यान २४ नागरिकांचे अहवाल आज निरंक आले आहे.या खेरीज सहा अहवाल नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.आता बाधित रुग्णांची संख्या ३४२ झाली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १५६ आहे.आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.तर उपचारानंतर १८२ जण दुरुस्त झाले आहे.पोहेगावात वारंवार विक्रमी रुग्ण आढळत असल्याने काल पासून हे गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे.मात्र आज मात्र एकच रुग्ण आढळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close