कोपरगाव तालुका
आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता दुरुस्तीचे काम
वाकड़ी (प्रतिनिधि)
कोपरगाव मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील वाकड़ी येथील आशुतोष युवा मंचचे आण्णासाहेब कोते यांनी सामाजिक बांधीलकी जपत लांडेवाड़ी नांदुर रस्त्यावरील शिंदे आहेर वस्तीकड़े जाणाऱ्या अत्यंत ख़राब रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती स्वखर्चातुन करुन देऊन एक वेगळा रिवाज तयार करुन आपल्या नेत्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा नवीन पायंडा पडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
कोपरगाव मतदार संघाचे आ.काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राहाता तालुक्यातील वाकड़ी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी नांदुर लांडेवाड़ी रस्त्यावरील शिंदे आहेर वस्तीकड़े जाणाऱ्या अत्यंत ख़राब रस्त्याची दुरुस्ती करुण आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक कार्यातून कसा करावा हे दाखवून दिले आहे.
आज काल गावात आपली वेगळी छाप पडावी आपला वरिष्ठ नेत्याच्या बाजूला मोठा फ़ोटो असावा म्हणून अनेक जवळीक असलेले कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे मोठमोठाले फलक चौकात लावतात काही कार्यकर्ते तर लोकवर्गणी गोळा करुण वाढदिवसाचे फलक लावतात मात्र कोपरगाव मतदार संघाचे आ.काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राहाता तालुक्यातील वाकड़ी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी नांदुर लांडेवाड़ी रस्त्यावरील शिंदे आहेर वस्तीकड़े जाणाऱ्या अत्यंत ख़राब रस्त्याची दुरुस्ती करुण आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक कार्यातून कसा करावा हे दाखवून दिले आहे.माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी ज्या भागात हे सामाजिक विकास कार्य केले त्या प्रभागात काळे गटाचा एकही सदस्य नसला तरी हे कार्य करत असताना कुठलाही राजकीय मतभेद न करता केवळ जिथे कमी तिथे आम्ही या सामाजिक वृत्तीतुन आ. काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य येथील नागरिकांच्या मागणीनुसार कोते यांनी हे विकास कार्य केले. तसेच जाधव पानसरे वस्ती कडील ख़राब रस्त्याची दुरुस्ती देखील आ आशुतोष काळे युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी अनिल कोते,सुरेशआबा लहारे,कल्याणराव सदाफळ,मुरलीधर शेळके,मिलिंद सदाफळ,त्रिबकनाना लहारे,वसंत डोखे,प्रभाकर एलम,ग्रा प सदस्य जालिंदर कोते,निलेश कोते,भाऊसाहेब अहिरे,भाऊसाहेब लहारे, किशोर कोते,एन टी कोते,अनिल गोरे,संजय कोते,रविंद्र लहारे,जाकिर शेख,विनायक गुलदगड आदींचे सहकार्य लाभले आहे.