जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात धारणगावसह आजही मोठी रुग्ण वाढ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गत दोन दिवसात ३२ रुग्ण आढळल्यानंतर आज १०१ संशयित नागरिकांचे श्राव तपासण्या करण्यात आल्यावर त्यात पुन्हा कोपरगावात १४ रुग्ण तर मंजूर ग्रामपंचायत हद्दीत एक वीस वर्षीय पुरुषाच्या घरातील ३ जण असे अठरा रुग्ण बाधित झाल्याचे आढळले आहे तर एक धारणगाव येथे एक आज एक ४५ वर्षीय पुरुष असे एकूण अठरा रुग्ण बाधित आढळले असून आता बाधित रुग्णांची संख्या १३५ झाली असून आज पाच रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती तालुका अवैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांत या साथीची साधार भीती वाढली आहे.

कोपरगाव पोलिसानी या प्रकरणी या आरोपींना हजर करण्यासाठी चल चित्रणाच्या माध्यमातून हजर करण्याचा आग्रह धरला होता मात्र न्यायिक व्यवस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समक्ष हजर करण्याचा आग्रह धरल्याने हि बला आली होती.मात्र तेथे पोलिसानी याबाबत मोठी जोखीम पत्करूनही तेथे हजर केले मात्र ऐन वेळी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लहरीपणामुळे नकार दिला त्यातून हि बला ओढवली असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०५ हजार २२२ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १७ लाख ५७ हजार ३९३ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३७ हजार ४५२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ४ लाख ३१ हजार ७१९ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १५ हजार ३१६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ० ५ हजार २३१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून दोन बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह १३५ रुग्ण बाधित झाले आहेत.आता क्रियाशील रुग्ण ८९ असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरात बाधित रुग्णांत टिळेकर वस्तीवर दोन रुग्ण असून त्यात एक ६० वर्षीय पुरुष तर एक ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.या खेरीज संजीवनी (कोल्हे कारखाना)वर दोन रुग्ण बाधित आढळले असून त्यात १८ वर्षाचा तर दुसरा २७ वर्षाचा तरुण बाधित आढळला आहे.तर मंजूर ग्रामपंचायत हद्दीत ३ रुग्ण बाधित आढळले असून त्यात १३ वर्षीय मुलगा व ३२ व ३० वर्षीय दोन महिला बाधित आढळल्या आहेत.कोपरगाव शहरातील संजयनगर येथील दोन संशयित रुग्ण बाधित आढळले असून त्यात ८८ वर्षीय महिला,व २५ वर्षीय तरुणांचा समावेश आहे.या शिवाय त्यात परिसरात बैलबाजार रोड येथे ४ संशयीत आढळले असून त्यात ६६ व ३६ वर्षीय पुरुष, व ४५ व २७ वर्षीय महिला या साथीला बळी पडल्या आहेत.सुभाषनगर येथे एक १८ वर्षीय तरुण व महादेवनगर येथील ६३ वर्षीय पुरुष या विषाणूंचा शिकार ठरला आहे.हि साथ शंकरनगरला भिडली असून त्यात ३८ वर्षीय पुरुष बाधित झाला आहे.टिळकनगर येथेही या साथीने प्रारंभ केला असून यात एक ५० वर्षीय महिला बळी पडली आहे.या शिवाय धारणगाव येथे एक ४५ वर्षीय पुरुष बाधित निघाला आहे.

अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव पाठोपाठ आता धारणगावातही पोहचली असल्याचे स्पष्ट होत आहे.आता पोलीस विभागही बाधित आरोपींपासून बाधित होता-होता वाचले आहे.त्या सतरा पोलिसांचे अहवाल निरंक आले आहे.कोपरगाव न्यायालयात या आरोपींना हजर करण्याची सक्ती करण्यात आल्याने हि आपत्ती ओढवली असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी या आरोपींना हजर करण्यासाठी चल चित्रणाच्या माध्यमातून हजर करण्याचा आग्रह धरला होता मात्र न्यायिक व्यवस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समक्ष हजर करण्याचा आग्रह धरल्याने हि बला आली होती.मात्र तेथे पोलिसानी याबाबत मोठी जोखीम पत्करूनही तेथे हजर केले मात्र ऐन वेळी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लहरीपणामुळे नकार दिला त्यातून हि बला ओढवली असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.या बाबत कोपरगाव वकील संघाचे अधिकारी व सदस्य अस्वस्थ असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यातुन कसा मार्ग काढायचा यावर खल होत असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close