शैक्षणिक
आत्मा मालिकचा ओम भवार ९७ टक्के गुण मिळवून प्रथम
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाने बारा वर्षाची परंपरा कायम राखत इयत्ता शाळांत परिसक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. विदयालयाचा विदयार्थी ओम भवार याने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला तर कु.गवळी श्रृती व नेहरकर किरणकुमार ९६.८०टक्के द्वितीय तर पवार भारत ९६.२० टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.यात आत्मा मलिक विदयालयातील ३३३ विदयार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. हे सर्व विदयार्थी उत्तीर्ण होवून विदयालयाचा १०० टक्के निकाल लागला. यावर्षीच्या निकाला मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण ११७ विदयार्थींनी मिळविले हे विदयालयाची आजपर्यंतची सर्वाधिक संख्या असून ३२७ विदयार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर ‘अ’ श्रेणीमध्ये ५ विदयार्थी व ‘ब’ श्रेणी मध्ये १ विदयार्थी उत्तीर्ण झाले.
विदयालयातील विदयार्थ्यांच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी ८६.५० टक्के आहे. यासाठी विदयार्थ्यांची खास तयारी करून घेतली गेली त्याचे प्रतिबिंब या निकालात उमटले आहे.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल हे दर्जेदार शिक्षणासाठी लक्षवेधी ठरले आहे.व तो विश्वास या निकालाने कायम राहीला असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले आहे.
विदयार्थींना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख रमेष कालेकर,सागर आहिरे, मिना नरवडे,सचिन डांगे,पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे,रविंद्र देठे,अनिल सोनवणे, वर्गशिक्षक नयना आदमाने, गणेश रासणे, नितीन अनाप, आषा देठे, बाळकृष्ण दौंड,मिना बेलोटे,राजश्री पिंगळे,बबन जपे व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या विदयार्थींचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष भगवान दौंड,व्यवस्थापक हिरामण कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.