आरोग्य
कोपरगावात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सुरेगाव व करंजी नंतर वेळापूर व कोकमठाण हि गावे बाधित झालेलीच असताना आज कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खडकीरस्ता लोढा मंगल कार्यालयानजीक एक ५५ वर्षीय इसम व सहजानंदनगर येथील कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर आधीच संशय व्यक्त केलेला ५२ वर्षीय इसम व धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ३० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली असताना मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरापथ मार्गावरील एक चाळीस वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने आता कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या १४ झाली असल्याची माहिती नायब तहसीलदार योगेश कोतवाल यांनी दिली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर आणि परिसरात कोरोनाला आतापर्यंत तालुका व शहर प्रशासनाने चांगल्यापैकी ताब्यात ठेवले होते मात्र आता बाहेरून येणारे नागरिक हे बऱ्याच वेळा स्थानिक प्रशासनांस कुठलीही माहिती न देता आपल्या नातेवाईकांकडे अथवा घराकडे परस्पर येत आहे त्यातून कोरोना बाधितांची संख्या आता झपाटयाने वाढत आहे.त्यामुळे आता तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा स्थानिक सरपंच व समित्यांवर,व कायद्याचा फज्जा उडविणाऱ्या विरुद्ध कठीण कारवाई सुरु करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.तरच हि साथ नियंत्रणात ठेवता येणार आहे.
कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती त्यानंतर कोरोना रुग्णांची साखळीच सुरु आहे.त्यात सुरेगाव व करंजी येथे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना बाधित रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली होती.तर काल वेळापूर येथे एक महिला बाधित निघाली होती.काल दुपारी कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत शामवाडी परिसरात पुन्हा पुण्याहून आलेला इसम कोरोना बाधीत निघाला असताना तर सायंकाळी हि धक्कादायक माहिती हाती आली होती.कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खडकी रस्ता लोढा मंगल कार्यालयानजीक असलेल्या सुखशांतीनगर येथील एक ५५ वर्षीय इसम जे संवत्सर येथे शिक्षक असल्याची माहिती आहे.व सहजानंदनगर येथील आमच्या प्रतिनिधीने संशय व्यक्त केलेला कोल्हे कारखान्यावरील वरील ५२ वर्षीय इसम व धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ३० वर्षीय महिला आशा सेविका असे तिघे कोरोना बाधित आढळल्याने होते आता इंदिरापथ श्रद्धापॅराडाईज परिसरात आढळलेला रुग्ण हा कोकमठाण येथील रुग्णालयात परिचारिका असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान रात्री या परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते व डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.आता तालुक्यातील धारणगाव, सहजानंदनगर,सुखशांतीनगर,येथील या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले संशयित १५ जण ताब्यात घेण्यात आले आहे.आता या संशयित नागरिकांच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.