जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या गावी विद्यार्थिनीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 
   
  कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थिनीसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्याला चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे उघड झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थिनीसाठी राबवलेले मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर दिसत आहेत.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे व कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.त्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

  ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाकांक्षी सार्वजनिक आरोग्य अभियान असून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार,सुलभ आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा याचा मूळ उद्देश आहे.या अभियानांत केवळ उपचारांपेक्षा स्वच्छता,पिण्याचे पाणी,पोषण,माता व बालआरोग्य आणि आजार नियंत्रण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे.गावपातळीवर ठरवून दिलेले आरोग्यविषयक निकष पूर्ण करून ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ हा किताब दिला जातो.या अभियानासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे व कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.त्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

  सदर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे,जलसंपदा विभागाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका थोरात,माजी उपसरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी. के.थोरात,विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,उत्तम थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,मीना विठ्ठल थोरात,माजी सदस्य प्रकाश थोरात,अरुण थोरात,यासह
समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,आरोग्य सेविका राणी लोखंडे,आरोग्य सेवक डॉ.पंकज गलगट,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड,मच्छिंद्र पावसे,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय वाकचौरे,रखमा वाकचौरे,रामनाथ थोरात आदीसह विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

जवळके येथे मोफत वैद्यकीय तपासणी करताना समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,आरोग्य सेविका राणी लोखंडे आदी वैद्यकीय अधिकारी दिसत आहेत.

  दरम्यान त्यावेळी उपस्थित विद्यार्थिनींची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोफत तपासणी करून त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,आरोग्य सेविका राणी लोखंडे,आरोग्य सेवक डॉ.पंकज गलगट,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे व त्यांचे सहकारी आदींचे आदींचे योगदान लाभले आहे.उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close