आरोग्य
…या शहरात होणार नवीन रक्तपेढी सुरू !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे लायन्स समता ब्लड सेंटरचा उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता निवारा हौसिंग सोसायटी महादेव मंदिरासमोर संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत मानवी प्राण वाचवण्यासाठी रक्तपेढी (ब्लड बँक) वर्तमानात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतअसते.येथे गोळा केलेले रक्त सुरक्षित ठेवले जाते व गरजू रुग्णांना वेळेवर पुरवले जाते.त्यात अपघातांच्या वेळी,मोठ्या शस्त्रक्रिया करताना,तसेच थॅलेसेमिया व डेंग्यूसारख्या आजारांवर उपचारासाठी रक्तपेढी हाच एकमेव आधार असतो.ही गरज ओळखून कोपरगावात ही रक्तपेढी कार्यरत होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत मानवी प्राण वाचवण्यासाठी रक्तपेढी (ब्लड बँक) वर्तमानात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतअसते.येथे गोळा केलेले रक्त सुरक्षित ठेवले जाते व गरजू रुग्णांना वेळेवर पुरवले जाते.त्यात अपघातांच्या वेळी,मोठ्या शस्त्रक्रिया करताना,तसेच थॅलेसेमिया व डेंग्यूसारख्या आजारांवर उपचारासाठी रक्तपेढी हाच एकमेव आधार असतो.गंभीर जखमी किंवा रुग्णांना तातडीने रक्त पुरवून त्यांचे प्राण वाचवले जातात.आधुनिक उपकरणांच्या मदतीने रक्त दीर्घकाळ सुरक्षित ठेवले जाते.रक्तातील प्लेटलेट्स,प्लाझ्मा व लाल रक्तपेशी गरजंनुसार वेगवेगळ्या करून वापरता येतात.नैसर्गिक आपत्ती किंवा मोठ्या अपघातांच्या वेळी रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून मदत होते.त्यामुळे रक्तपेढीचे महत्व वादातीत समजले जात आहे.कोपरगाव शहरात वर्तमानात एक रक्तपेढी कार्यरत होती.मात्र वर्तमानात वाढती लोकसंख्या आणि रक्ताची गरज वाढत असल्याने ही रक्तपेढी महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून येत आहे.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख अतिथी म्हणून आ.आशुतोष काळे,विधानपरिषद आ.विवेक कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,एम.जे.एफ ला.राज मुच्छाल,एम.जे.एफ.ला.लायन्स डिस्ट्रीक्ट गर्व्हनर श्रेयस दिक्षीत आदी मान्यवर उपस्थिती रहाणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव लायन्सचे अध्यक्ष सचिन भडकवाडे आदींनी केले आहे.



