आरोग्य
नेत्रदान हे मृत्यूनंतरही प्रकाश देणारे दान-…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नेत्रदानासाठी जागृत कुटुंबाची भूमिका असते त्यासाठी मृत्यूनंतर नेत्रदानाची अंतिम संमती कुटुंबीयांकडून दिली जाते.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नेत्रदानाच्या इच्छेबद्दल कुटुंबीयांना आधीच माहिती देणे आवश्यक आहे.नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करता येते समाजात जागृती निर्माण करणे आणि नेत्रदानाची शपथ घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील डॉ.अशोक गावित्रे यांनी केले आहे.

“नेत्रदान कोणत्याही वयातील स्त्री किंवा पुरुष नेत्रदान करू शकतो.चष्मा वापरणारे व्यक्ती नेत्रदान करू शकतात.मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली व्यक्तीही नेत्रदान करू शकते.मधुमेह,उच्च रक्तदाब,दमा इत्यादी आजार असलेल्यांनाही बहुतांश वेळा नेत्रदान करता येते.धर्म,जात,लिंग किंवा सामाजिक स्थिती यांचा नेत्रदानाशी काहीही संबंध नाही.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो ४ ते ६ तासांच्या आत जवळच्या आय बँकेशी संपर्क साधावा लागतो” -डॉ.अशोक गावित्रे,कोपरगाव.
सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस महाराष्ट्रात व देशात नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो.त्यांचा जन्म १० जून १९२४ रोजी झाला होता.त्यांनी नेत्रचिकित्सक म्हणून आयुष्यभर मोलाचे कार्य केले.डोळ्यांच्या आजारांमुळे अंधत्व आलेल्या लोकांना दृष्टी मिळवून देणे आणि लोकांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. कॉर्नियल अंधत्वामुळे त्रस्त असलेल्या गरजू लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे असून त्या निमित्ताने त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांतील कॉर्निया (नेत्रपटल) दान करणे होय.या कॉर्नियाच्या साहाय्याने कॉर्नियामुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळू शकते.नेत्रदान हे केवळ दान नसून एका अंध व्यक्तीला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे.भारतात लाखो लोक कॉर्नियल अंधत्वाने ग्रस्त आहेत आणि त्यांच्यासाठी नेत्रदान हाच आशेची किरण आहे.डोळे हे मानवाला मिळालेली अमूल्य देणगी आहेत.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे डोळे जाळले किंवा पुरले जातात;परंतु तेच डोळे दान केल्यास अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणू शकतात.एका नेत्रदात्याच्या दोन्ही कॉर्नियामुळे साधारणतः दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही परिस्थितींमध्ये अधिक रुग्णांनाही फायदा होऊ शकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.नेत्रदान कोणत्याही वयातील स्त्री किंवा पुरुष नेत्रदान करू शकतो.चष्मा वापरणारे व्यक्ती नेत्रदान करू शकतात.मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली व्यक्तीही नेत्रदान करू शकते.मधुमेह,उच्च रक्तदाब,दमा इत्यादी आजार असलेल्यांनाही बहुतांश वेळा नेत्रदान करता येते.धर्म,जात,लिंग किंवा सामाजिक स्थिती यांचा नेत्रदानाशी काहीही संबंध नाही.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो ४ ते ६ तासांच्या आत जवळच्या आय बँकेशी संपर्क साधावा लागतो.प्रशिक्षित डॉक्टर किंवा तंत्रज्ञ मृत व्यक्तीच्या घरी किंवा रुग्णालयात येऊन प्रक्रिया पूर्ण करतात.ही प्रक्रिया साधारण १० ते १५ मिनिटांत पूर्ण होते आणि त्यामुळे चेहऱ्याचे विद्रूपीकरण होत नाही किंवा अंत्यसंस्काराला विलंब होत नाही.मात्र नेत्रदानाबाबतचे काही गैरसमज असून नेत्रदान केल्यास संपूर्ण डोळा काढला जातो.पण तसे नसून प्रत्यारोपणासाठी मुख्यतः कॉर्नियाचा वापर केला जातो.आधुनिक पद्धतींमध्ये संपूर्ण डोळा काढला जात नाही.त्यात आणखी एक गैरसमज असून वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत.मात्र वय हा अडथळा नाही.कॉर्नियाची गुणवत्ता महत्त्वाची असते.चष्मा लावणारे किंवा मोतीबिंदू झालेले लोक नेत्रदान करू शकत नाहीत असा एक आणखी एक गैरसमज आहे मात्र तसे काही नाही.अशा व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.याशिवाय नेत्रदानामुळे चेहरा विद्रूप होतो असा एक प्रचलित गैरसमज असून तसे काही नाही.सत्य हे आहे की,नेत्रदानामुळे चेहऱ्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.नेत्रदानासाठी कुटुंबाची भूमिका असते त्यासाठी मृत्यूनंतर नेत्रदानाची अंतिम संमती कुटुंबीयांकडून दिली जाते.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नेत्रदानाच्या इच्छेबद्दल कुटुंबीयांना आधीच माहिती देणे आवश्यक आहे.नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करता येते समाजात जागृती निर्माण करणे आणि नेत्रदानाची शपथ घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.असलेल्या लाखो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी कॉर्नियाची आवश्यकता आहे.मात्र उपलब्ध दात्यांची संख्या गरजेच्या तुलनेत खूप कमी आहे.त्यामुळे अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करणे काळाची गरज आहे.आगामी काळात नेत्रदान हे मृत्यूनंतरही मानवतेची सेवा करण्याचे सर्वोच्च उदाहरण मानले पाहिजे.आपण जग सोडल्यानंतरही आपल्या डोळ्यांतून एखादा अंध व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकतो.म्हणूनच नागरिकांनी “नेत्रदान करा,अंधांच्या जीवनात प्रकाश फुलवा”असे आवाहन डॉ.अशोक गावित्रे यांनी शेवटी केले आहे.



