जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कॅनरा बँकेकडून…या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर प्राप्त

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कॅनरा बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून(सी.एस.आर.)उपक्रमांतर्गत श्री साईबाबा हॉस्पिटल करिता ३५ लाख रुपयांचे दोन अत्‍याधुनिक व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले असल्याची माहिती शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने दिली आहे.कॅनरा बँकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

   कॅनरा बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून(सी.एस.आर.)उपक्रमांतर्गत श्री साईबाबा हॉस्पिटल करिता ३५ लाख रुपयांचे दोन अत्‍याधुनिक व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले असल्याचे दिसत आहे.

  

   सदर मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व कॅनरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले आहे.

  यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे,कॅनरा बँकेचे विभागीय अधिकारी अनिल कुमार,नागपूर विभागाचे सुरेंद्र भाऊ,व्यवस्थापक उमेश शेटे व चंद्रशेखर सोनी तसेच श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे,सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात,जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह हॉस्पिटल मधील डॉक्‍टर व कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close