जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुखपट्या बांधल्या नाही,सहा जणांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून गत पाच महिन्यात ०१ हजार ८३६ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३३ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून काल दुपारी दीडच्या सुमारास तहसील कार्यालया नजीक केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ८३६ इतकी झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे कारवाई अटळ मानली जात आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील १४ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील १५ जण असे २९ नागरिक बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ८३६ इतकी झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत आरोपी राजेंद्र विश्वनाथ गुडघे वय-४०,रा.सोनेवाडी,ऋषी अंबादास क्षीरसागर,वय-२४ रा.भास्कर वस्ती येसगाव,विजय अनंत कुलकर्णी वय-४५, रा.साकुरी,सुनील दत्तात्रय जाधव,वय-४२,रा.करंजी,सुनील सीताराम वाळके,वय-३१,रा.राहुरी,विशाल वाल्मिक शिवदे,वय-३२ रा.इंदिरानगर कोपरगाव आदीं सात जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७३५/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close