जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या खुनातील आणखी सात आरोपी गजाआड,सहा दिवसांची कोठडी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत सुरेश गिऱ्हे याचा सायंकाळच्या सुमारास निर्घृण खून करणाऱ्या प्रमुख आरोपी असलेल्या संवत्सर येथील रविंद्र आप्पासाहेब शेटे (वय-३९) व विजय बाळासाहेब खर्डे (वय-३१) रा.पढेगाव चौकी संवत्सर,या दोघांसह अमोल सोपानराव मते (वय-३०)रा.लाडगाव ता.वैजापूर,साईनाथ वाल्मिक मते (३०) रा.येवला, रविंद्र जालिंदर मगर (२५) मूळ रा.संवत्सर ह.मु.शिर्डी,सुनील पंढरीनाथ नागवे,(वय-२९) रा.सोमठाणा ता.बदनापूर जि. जालना,ह. रा.संवत्सर व लोकेश रायप्पा मुद्दापुर,(वय-२६) रा, चाकण-तळेगाव रोड,(वय-२६) यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी धुळे जिल्ह्यातून मुसक्या आवळून त्यानां कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांच्या समोर हजर केले असता त्यानां सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

या घटनेतील प्रमुख आरोपी रविंद्र शेटे व विजय खर्डे हे फरारच होते.त्यांच्या मागावर पोलीस होते.तथापी हे आरोपी धुळे शहरात दडून बसल्याची माहिती पोलिसांना आपल्या खबऱ्यामार्फत मिळाली होती.त्यांनी दबा धरून आज सकाळी केलेल्या कारवाईत रविंद्र शेटे,विजय खर्डे, अमोल मते,साईनाथ मते,रवी मगर, सुनील नागवे,लोकेश मुद्दापुर आदी सात जणांच्या मुसक्या आवळून आज कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या घटनेत हा खून करण्यासाठी आरोपीनी शिर्डी, लौकी,दहिगाव बोलका, वैजापूर,संवत्सर आदी ठिकाच्या घरी तर काही हॉटेलात बैठका घेऊन हा खुनाचा गुन्हा केला आहे हे सिद्ध झाले आहे.विशेष म्हणजे पूर्वी २०१२ साली बंटी शिनगर याच्या खुनाच्या गुन्ह्यात येरवडा येथे शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर बाहे असलेला आरोपी किरण आप्पासाहेब शेटे रा.रामवाडी संवत्सर याने देखील सक्रिय सहभाग नोंदवून खून करण्यासाठी मदत केलेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात आठ वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुणांची वाळूचोरीच्या भानगडीतून सन-२०१२ मध्ये सुरेश गिऱ्हे याचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहारी शिनगर याच्या हत्येत संवत्सर रवी आप्पासाहेब शेटे हा एक आरोपी आहे. त्याने व विजय बाळासाहेब खर्डे या दोघांनी हि हत्या केल्याची फिर्यादी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत तरुणांच्या शामराव भीमराव गिऱ्हे या पित्याने दाखल केली होती. या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती.तर त्यातील आरोपी फरार झाले होते.त्यातील एक फरार आरोपी पैकी रवी शेटे आहे.तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.त्यावर अनेक गुन्हे दाखल होते.त्यातून त्याला हद्दपारही केले होते.तो पासून हा आरोपी फरार असून त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिऱ्हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते.व ते एकमेकांच्या जीवावर उठले होते.त्यातून रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावठी कट्टा व तलवारीच्या साहाय्याने निर्घृण खून केला होता.त्यातून पुन्हा हा सुडाचा प्रवास सुरु झाला होता.

या घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप यांच्यावर सोपवला होता.त्यांनी विविध ठिकाणी पाच पथके तपासासाठी रवाना केले होते.पोलिसानी गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून चार आरोपीना जेरबंद केले आहे.त्यात नितीन सुधाकर अवचिते रा. तळेगाव स्टेशन ता.मावळ,शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा पिंप्री चिंचवड ता.हवेली जि. पुणे,मूळ रा.गारखेडा इंदिरानगर ता.जि. औरंगाबाद,रामदास माधव वलटे रा.लौकी ता.कोपरगाव.आकाश मोहन गिरी रा.खराबवाडी चाकण ता.खेड जि. पुणे आदीं चार आरोपींना विविध ठिकाणाहून अटक करून काल दुपारी कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले होते न्यायालयाने येत्या २६ मार्च पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

तथापी यातील प्रमुख आरोपी रविंद्र शेटे व विजय खर्डे हे फरारच होते.त्यांच्या मागावर पोलीस होते.तथापी हे आरोपी धुळे शहरात दडून बसल्याची माहिती पोलिसांना आपल्या खबऱ्यामार्फत मिळाली होती.त्यांनी दबा धरून आज सकाळी केलेल्या कारवाईत रविंद्र शेटे,विजय खर्डे, अमोल मते,साईनाथ मते,रवी मगर, सुनील नागवे,लोकेश मुद्दापुर आदी सात जणांच्या मुसक्या आवळून आज कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अड्.सोमनाथ व्यवहारे यांनी तर आरोपींचा वतीने अड्.संजय मंडलिक यांनी काम पाहिले.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करीत आहे.

दरम्यान या घटनेत हा खून करण्यासाठी आरोपीनी शिर्डी, लौकी,दहिगाव बोलका, वैजापूर,संवत्सर आदी ठिकाच्या घरी तर काही हॉटेलात बैठका घेऊन हा खुनाचा गुन्हा केला आहे हे सिद्ध झाले आहे.विशेष म्हणजे पूर्वी २०१२ साली बंटी शिनगर याच्या खुनाच्या गुन्ह्यात येरवडा येथे शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर बाहे असलेला आरोपी किरण आप्पासाहेब शेटे रा.रामवाडी संवत्सर याने देखील सक्रिय सहभाग नोंदवून खून करण्यासाठी मदत केलेली आहे.विजय खर्डे याचे नावावर या पूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २०१४ चे दोन गुन्हे दाखल आहे.तर रवींद्र शेटे हा बंटी शिनगरच्या २०१२ च्या गुन्ह्यातून फरार होता.या गुन्ह्यात अद्याप चार आरोपी फरार आहे.त्यांचा शोध अद्याप सुरु आहे.अटक आरोपींची संख्या आता अकरा झाली असून अद्याप चार जण अद्याप फरार आहे.ते लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येतील असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आठ दिवसात अकरा आरोपींच्या मुसक्या आवळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close