आरोग्य
..होय,कोरोनाला आपण हरवू शकतो-..या महाराजांनी दिला विश्वास
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मानवाच्या आधुनिक जिवन शैलीला लागलेल्या कोरोना नावाच्या विषाणूला आपण हरवू शकत असल्याचे प्रतिपादन करून वैश्विक व राष्ट्रीय स्तरावरून शासन, प्रशासन आपले कार्य अतिशय जबाबदारीने पार पाडत आहे. या सर्व प्रयत्नांना जोपर्यंत जनमाणसांचा पाठींबा व सहकार्य मिळत नाही तो पर्यंत अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि.२२ मार्च रोजी आपल्या निवासस्थानी बंदिस्त राहण्याचे आवाहन समस्त भारतीय नागरीकांना केले असून ते योग्य असल्याचा निर्वाळा कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाचे श्री जंगलीदास महाराज यांनी नुकताच एका बैठकीत दिला आहे.
प्रत्येक भारतीय नागरीक सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपापल्या वास्तव्याचे ठिकाणीच राहणार आहे. या १४ तासातील काही तास जर आपण ध्यान साधनेसाठी म्हणजेच आत्मचिंतनासाठी व्यतीत केले तर, निश्चितच याचा परिणाम आपण स्वस्थ आणि स्थिर होऊन स्वत:ला व आपल्या कुटुंबीयांना आणि संपुर्ण भारतासहीत अखिल मानव जातीला होईल-जंगलीदास महाराज
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या २५८ वरुन २९८ झाली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने केलं आहे. तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि.२२ मार्च रोजी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन जनतेला केले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात श्री जंगलीदास माउली यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी परमानंद महाराज,विवेकानंद महाराज,गणेश महाराज,ब्रह्मनंद महाराज, आत्मानंद महाराज,प्राचार्य सुधाकर मलिक आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,”भारतात आध्यत्मिक शक्ती मोठ्या प्रमाणात दडलेली आहे.त्यात स्वतःत दडलेली आत्मिक शक्ती खूपच प्रभावी आहे.त्यासाठी ही संचार बंदी म्हणजे जनतेला त्याचा शोध घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दिलेली एक संधी आहे.ती जनतेसाठी स्वयंशासीत पध्दतीने अंगीकारलेली अभिनव जिवन पध्दती असेल. अशा स्वयंशासीत पध्दतीने पाळला जाणारा नियम प्रत्येक माणसाला स्वत:च्या ठायी स्थीर करणारा असेल. यामध्ये प्रत्येक भारतीय नागरीक सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपापल्या वास्तव्याचे ठिकाणीच राहणार आहे. या १४ तासातील काही तास जर आपण ध्यान साधनेसाठी म्हणजेच आत्मचिंतनासाठी व्यतीत केले तर, निश्चितच याचा परिणाम आपण स्वस्थ आणि स्थिर होऊन स्वत:ला व आपल्या कुटुंबीयांना आणि संपुर्ण भारतासहीत अखिल मानव जातीला होईल.प्रत्येकात आत्मशक्तीचा स्त्रोत आहे. याच आत्मशक्तीच्या जोरावर आपण जीवन जगत आहोत. हिच आत्मशक्ती विश्वातील चराचर जीवाच्या ह्रदयात स्थानापन्न आहे. म्हणून या आत्म शक्तीचे ध्यान चिंतन केल्यास प्राप्त होणारी सकारात्मक वैश्विक आत्मीक ऊर्जा शक्तीमुळे एक पवित्र शुध्द व चैतन्यपूर्ण लहरी वातावरणामध्ये निर्माण होतील. याच ध्यानाच्या माध्यमातून या वैश्विक शक्तीचे म्हणजेच परमात्म्याची प्रार्थना केल्यास कोरोनासारख्या या महामारीतून विश्वाची मुक्तता होईल व सर्वत्र प्रफुल्लीत सचेतना निर्माण होईल.असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.