जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बोलकीत अवैध वाळू उपसा दोन ट्रॅक्टर पकडले,एक फरार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास प्रातिबंध असतानाही बोलकी ग्रामपंचायत हद्दीत नारंदी नदीतून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची खात्रीलायक बातमी महसूल विभागाला मिळाल्याने त्यांनी वाळू उपसा प्रतिबंधक पथकाची त्या ठिकाणी रवानगी केली असता त्यात तथ्य आढळले असून या बाबत त्यांना महिंद्रा सरपंच व महाले दत्तात्रय उत्तम यांचा स्वराज-४५५ (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.५२८४)असे दोन ट्रॅक्टर वाळू चोरी करताना आढळून आले आहे.बोलकीचे कामगार तलाठी संदीप प्रदीप लहाने यांनी या प्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन त्यांना तहसील कार्यालयात आणत असताना त्यातील महिंद्रा सरपंच (एम.एच.१७,ए.२३५६) वरील आरोपी चालक भास्कर चांगदेव बोळीज हा मधूनच आपला ट्रॅक्टर घेऊन फरार झाल्याने तलाठी यांनी त्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गोदावरी खोऱ्यात भूजल पातळी खूप खोलवर गेल्याने शेती क्षेत्राचे न भूतो अशी हानी झाली आहे.महसूल अधिकारी तीन वर्षात बदली होत असल्याने जाता-जाता हात धुवून घेत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे.मात्र यावर ज्या राजकीय नेत्यांनी उत्तर शोधावयाचे त्यांचेच हात बरबटले असल्याने समस्या गंभीर बनली आहे.बोलकी येथील उदाहरण हे त्यासाठी बोलके ठरावे.तलाठी व त्यांच्या वाळू प्रतिबंधक पथकाने हे ट्रॅक्टर ताब्यात घेतले असतानाही सुमारे ५ लाख ६० हजारांचा ऐवज पळविण्याचे धाडस आरोपी भास्कर बोळीज करतो हे त्याच मुजोरीचे प्रतीक मानले जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचोरी हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे.यातून खून पडु लागले आहेत.तर काही राजकीय पुढारी यास प्रतिबंध करण्या ऐवजी आपल्या तुंबड्या भरून घेत आहेत.परिणामी हा प्रश्न अजून गंभीर बनला आहे.भोजडे,येथे नुकताच या बाबीवरून एकाचा खून झाल्याची घटना ताजी आहे.या पूर्वीही बारा वर्षांपूर्वी तर कोकमठाण येथे व संवत्सर येथे २०१२ साली यावैध वाळूतून मुडदे पडले आहे.हि अत्यंत गंभीर बाब असून यातून वाळूचोरांकडे मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे आढळून येत आहेत.त्यातून या घटना वाढीस लागल्या आहेत.या कडे सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न म्हणून पाहणे गरजेचे आहे.यातून गोदावरी खोऱ्यात भूजल पातळी खूप खोलवर गेल्याने शेती क्षेत्राचे न भूतो अशी हानी झाली आहे.महसूल अधिकारी तीन वर्षात बदली होत असल्याने जाता-जाता हात धुवून घेत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे.मात्र यावर ज्या राजकीय नेत्यांनी उत्तर शोधावयाचे त्यांचेच हात बरबटले असल्याने समस्या गंभीर बनली आहे.

बोलकी येथील उदाहरण हे त्यासाठी बोलके ठरावे.तलाठी व त्यांच्या वाळू प्रतिबंधक पथकाने हे ट्रॅक्टर ताब्यात घेतले असतानाही सुमारे ५ लाख ६० हजारांचा ऐवज पळविण्याचे धाडस आरोपी भास्कर बोळीज करतो हे त्याच मुजोरीचे प्रतीक मानले जात आहे.या प्रकरणी तलाठी संदीप लहाने यांनी या दोन्ही ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close