आरोग्य
गर्भाशयाच्या कर्करोगावर ‘सीरम’ची स्वदेशी लस

न्यूजसेवा
मुंबई :
देशात आता गर्भाशयाच्या कर्करोगावरची पहिली स्वदेशी लस मिळणार आहे.ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एआयआय) ला गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध लस तयार करण्याची परवानगी दिली आहे.या लसीचं नाव ‘सेर्वाव्हॅक’ असं ठेवण्यात आलं आहे.या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.
“सीरम इन्स्टिट्यूट’ने गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध ‘क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (सीएचपीव्ही) या लसीसाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती.या लसीच्या फेज २ आणि ३ च्या चाचण्या झाल्या आहेत.चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातल्या महिलांवर प्रभावी ठरली असल्याचा दावा केला जात आहे.या लसीचा सर्व प्रकारच्या एच.पी.व्ही.विषाणूंवर परिणाम दिसून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”‘सीरम इन्स्टिट्यूट’ने गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध ‘क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (सीएचपीव्ही) या लसीसाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती.या लसीच्या फेज २ आणि ३ च्या चाचण्या झाल्या आहेत.चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातल्या महिलांवर प्रभावी ठरली असल्याचा दावा केला जात आहे.या लसीचा सर्व प्रकारच्या एच.पी.व्ही.विषाणूंवर परिणाम दिसून आला आहे.
एच.पी.व्ही.लसीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं असं सांगण्यात आलं.गर्भाशयाचा कर्करोग हा भारतीय महिलांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.या कर्करोगामुळे दर वर्षी अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो.खतरनाक बाब म्हणजे दरवर्षी गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणार्या महिल्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ होते.गर्भाशयाचा कर्करोगाची वेळीच काळजी घेतली तर त्यावर उपचार करता येतातच पण उशीर झाल्यास किंवा संसर्ग पसरल्यास मृत्यू होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार,गर्भाशयाचा कर्करोग हा जगातल्या महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे.२०२० मध्ये,जगभरात सहा लाखांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आणि ३.४२ लाख मृत्यू झाले.२०२० मध्ये, ९० टक्के प्रकरणं कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत.गर्भाशयाचा कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) मुळे होतो.एचपीव्ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्करोगामागील कारण आहे. एचपीव्ही सहसा संभोगाद्वारे पसरतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय असणार्या स्त्रिया आणि पुरुषांना आयुष्यात कधी तरी एचपीव्हीची लागण होऊ शकते.
भारतात ४४ कोटींपेक्षा अधिक महिला राहतात. १५ ते ६४ वयोगटातल्या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा जास्त धोका असतो. ‘नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम’च्या आकडेवारीनुसार, भारतात गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षं वाढत आहे. २०१५ मध्ये देशात गर्भाशयाच्या कर्करोगाची ६५ हजार ९७८ प्रकरणं नोंदवली गेली आणि २९ हजार २९ मृत्यू झाले. त्याच वेळी, २०२० मध्ये ७५ हजार २०९ प्रकरणं नोंदवली गेली आणि ३३ हजार ९५ मृत्यू झाले. गर्भाशयाचा कर्करोग जडण्यास अनेक वर्षं लागतात. त्यामुळे सुरुवातीला त्याची लक्षणं दिसत नाहीत. गर्भाशयाचा कर्करोग होतो तेव्हा सामान्यतः गुप्तांगातून रक्तस्त्राव जास्त होतो.