जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या जिल्ह्यात पहिलवानांची भरणार शाळा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत आगामी दि.२९ ते ३० एप्रिल रोजी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने,’आत्मा मालिक कुस्ती केंद्र’ सुरु होत असून येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्रात आयोजित केली असल्याची माहिती कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे.

  

भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक (एन.आय.एस.) राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे.हा दोघांमध्ये खेळला जातो.डाव,चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते.या खेळात अनेक डावपेच असतात.उदा.कलाजंग,ढाक,मोळी,निकाल, आतील व बाहेरील टांग,एकेरी पट,दुहेरी पट,गदालोट,एक चाक,धोबीपछाड इत्यादी.हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते.कुस्तीचे ऑलंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.महाराष्ट्रात हा रांगडा खेळ पश्चिम महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे.मात्र अलीकडील काळात तो लोप पावत चालला असून त्याला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी जंगली महाराज आश्रम ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.व सरकारी अनुदानातून या मातीतील तरुणांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने संधी प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषद आयोजित करून नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.त्यावेळी ट्रस्टचे विश्वस्त भोंगळे हेही उपस्थित होते.


   भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक (एन.आय.एस.) राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.

नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण.

  आत्मा मालिक कुस्ती केंद्राला २००६ पासून साईची मान्यता आहे.आजपर्यंत आत्मा मालिकमधून ०४ विद्यार्थ्यानी आंतर राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत.साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरीता वय वर्ष १० ते १६ वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे.निवड चाचणी प्रक्रियेतुन निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र,कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी रहाणे अनिवार्य केले आहे.असे आत्मा मालिक कुस्ती केद्रांचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले आहे.

   या मल्लांना भारतीय खेल प्राधिकरण (एस.आय.ए.) तर्फे दरमहा ०१ हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक क्रीडा साहित्य संच दिला जाणार आहे.तरी संपुर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ठिक ११ वाजता आत्मा मालिक कुस्ती केंद्र,कोकमठाण येथे हजर राहावे असे आवाहन विष्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आहे.

     दरम्यान या निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा,विभाग,राज्य,राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र,शाळेचा बोनाफाईड,आधार कार्ड,चार पासपोर्ट साईज फोटो,स्वतःचे बॅंक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व  झेराॅक्स सोबत येताना आणाव्यात असे आवाहन शेवटी सूर्यवंशी यांनी केले आहे.ग्रामीण भागातील या क्षेत्रात आपले भविष्य घडू पाहणाऱ्या युवकांना हि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थानीं ट्रस्टच्या या उपक्रमाचे राज्यभर स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close