कोपरगाव तालुका
कोपरगावात आठवडे बाजारासह जनावरांचा बाजार बंद

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरी तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे गंभीर दाखल घेतली असून त्यावर प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत तालुक्याचा जनावरांचा बाजार व कोपरगाव शहरात सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत.
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हा संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात.
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हा संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत.राज्यात कोरोनाची रुग्ण आढळले असून नगर येथेही एक रुग्ण आढळल्याने प्रशासन दक्ष झाले आहे.या पार्श्वभूमीवर हि दक्षता घेण्यात येत आहे.कोपरगाव बाजार समितीने या बाबत एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन त्यात मंगळवार दि.२४ मार्च पर्यंत पुढील आदेश होईपर्यंत कोपरगाव व शिरसगाव उपबाजार बंद ठेवण्याचा निर्णय सभापती संभाजी रक्ताटे यांनी जाहीर केला आहे.
तर कोपरगाव नगरपरिषदेने सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय शासन आदेशाप्रमाणे घेतला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कळवले आहे.याची नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहन शेवटी केले आहे.