जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

व्यवसायात आजही नीतीमूल्य महत्वाचेच-मालपाणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील उद्योजक स्व.बाळासाहेब साखरे व त्यांच्या कुटुंबांने सामाजिक योगदान व दायित्व कायम निभावले असून त्यांनी जीवन मूल्य कायम सांभाळले त्यामुळे त्यांची व्यवसाय उदीम उत्तरोत्तर प्रगती केले असल्याचे प्रतिपादन संगमनेर येथील उद्योजक गिरीश मालपाणी यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“स्व.बाळासाहेब साखरे यांचे व्यवसाय यांच्यातील सचोटी,प्रामाणिकपणा,आत्मविश्वास,सक्रियता,सातत्य,हिंमत या सहा गुणाबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.त्यामुळेच ते आपल्या जीवनात यश मिळवू शकले”-गिरीश मालपाणी,उद्योजक मालपाणी उद्योग संगमनेर.

कोपरगाव शहरात व राज्यात विविध व्यवसायाद्वारे आपला ठसा उमटवणाऱ्या विविध व्यावसायिकांचा”समता” सभागृहात स्व.बाळासाहेब साखरे ट्रस्ट द्वारे,”कोपरगाव व्यापार भूषण पूरस्कार” देऊन गिरीश मालपाणी यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

सदर प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष ,ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके,जेष्ठ भाजप नेते रामदास खैरे,समता चे संचालक सुनील बंब,अरविंद भन्साळी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,मधुकर साखरे,प्रमोद साखरे,संजय भन्साळी,मयूर साखरे,सौरभ साखरे,समताचे संचालक संदीप कोयटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी त्यांनी पुढे बोलताना जीवनात जीवन मूल्य किती महत्वाचे आहेत या साठी ‘ऍपल’ कंपनीचे व दुबईतील कंपनीचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे.तेच जीवन मूल्य स्व.बाळासाहेब साखरे यांनी पाळले असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यांनी त्यावेळी स्व.साखरे यांचे व्यवसाय यांच्यातील सचोटी,प्रामाणिकपणा,आत्मविश्वास,सक्रियता,सातत्य,हिंमत या सहा गुणाबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.त्यामुळेच ते आपल्या जीवनात यश मिळवू शकले.त्यांनी आपल्या प्रदीर्घ व गंभीर आजारात जे धाडस दाखवले ते अतुलनीय असे होते.

त्यावेळी त्यांनी कोपरगावात प्रसिद्ध व्यापारी स्व.बाळासाहेब साखरे यांनी आपल्या कर्तृत्वाने कोपरगाव शहर व नगर जिल्ह्यात आपला लौकिक स्थापित केला होता.त्यांच्या नावाने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून कोपरगाव शहरात विविध क्षेत्रात आपला लौकिक स्थापित करणाऱ्या व्यावसायिकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल जाहीर कौतुक केले आहे.

सदर प्रसंगी प्रथम पुरस्कारासाठी भन्साळी उद्योगास समूहाचे संस्थापक स्व.धनराजशेठ भन्साळी या शिवाय या ट्रस्टने पुणे येथील व्यावसायिक रामविलास मुंदडा यांनाही संजय मालपाणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.

कार्यक्रमाचें प्रास्तविक ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप साखरे यांनी केले तर उपस्थितांना रवींद्र बोरावके,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन ओमप्रकाश कोयटे यांनी स्व.बाळासाहेब साखरे यांनी त्यांचे कर्तृत्व रंगवताना ते म्हणाले की,”त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते हे संतना त्यांचेकडे एका शिलाई मशीनच्या ५१ मशीन त्यांनी आपल्या कौशल्याने वाढवल्या होत्या.त्यांनी कायम सर्वोच्च काम करण्यात रस दाखवला होता.त्यांनी व्यवसाय वाईंनचा निवडला तरी त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने दारूला कधी स्पर्श केला नाही हे विषेश!त्यांनी आपला वेळ कधी वाया घालवला नाही.अल्पशिक्षित असतानाही त्यांनी इकॉनॉमिक टाइम्स वाचत असत.व त्यांनी आम्हाला सल्ला देण्यात ते आघाडीवर असत.त्यांनी,”कॅन्सर रोग निदान शिबिर” त्यांनी आयोजित केले होते.त्यांनी व्यापारी कौशल्याबाबत स्व.धनराज भन्साळी यांचे कौतुक केले होते.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार साखरे परिवाराच्या वतीने केले आहे.

यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मयूर साखरे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close