जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सदगुरु गंगागीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु . ए. सी. व स्टाफ अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅन एन्सुरिंग क्वालिटी इन इन्स्टिट्यूशन इन नॅक प्रिपरेशन’ या विषयावरील एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला. सदर प्रोग्रॅमचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे माजी आँडिटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध- पुणे येथील प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
पहिल्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे येथील आय. क्यु . ए. सी. समन्वयक डॉ. सविता पाटील यांनी ‘द रोल ऑफ आय. क्यु . ए. सी. अॅण्ड इट्स नॅक फ्रेमवर्क’ या विषयावर तर प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी ‘बेंचमेकिंग इन नॅक डॉक्युमेंटेनशन पजेस टू एस. एस. आर. व्हाया फॉरमॅटस’ या विषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. एस. बी. पाटील यांनी ‘जिमखाना अॅण्ड एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटी – कल्चरल, एन.एस. एस., एन. सी. सी.’ या अनुषंगाने तर प्रा. सायली गोसावी यांनी ‘फिडबॅक सिस्टीम’ या संदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
सर्व मान्यवर मार्गदर्शकांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अॅकॅडमीचे चेअरमन प्रा. उत्तम गवळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुनील काकडे व प्रा. जी. डी. भगत यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव यशवंत यांनी केले. प्रा. डॉ. एन. एम. चव्हाण यांनी आभार मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे आय. क्यु . ए. सी. समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. ए. के. देशमुख, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. विजय निकम, सर्व क्रायटेरिया प्रमुख, विभागप्रमुख, आदींसह महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close