जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आगे-आगे देखो…होता है क्या!-आ.काळेंची गुगली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात ही कामे म्हणजे फार थोडी आहेत यातसर्वात महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या पाच क्रमांकाचे काम सुरू होण्यात अडचण राहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यावेळी त्यांनी,” ये तो अब झ्या’कि है,आगे-आगे देखो होता है क्या! असे म्हणून आगामी काळात आणखी मोठी कामे करण्याचे सूतोवाच करून कोपरगावात एका कार्यक्रमात गुगली टाकली आहे.

कोपरगाव तालुक्याचा पाणी प्रश्न आ.काळे यांनी सोडलाच पण त्यांनी तालुक्यातील रस्त्यांचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे.त्यांनी साई संस्थानच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र निधी मोठ्या प्रमाणावर आणला आहे.त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे”ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.

कोपरगाव शहराचा गंभीर बनलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साठवण तलाव क्रमांक पाचसाठी राज्य सरकारकडून १३४.२४ कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा नागरी सत्कार आ.काळे मित्र मंडळाचे वतीने आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, जेष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष विजय बंब,उद्योजक कैलास ठोळे,धरमचंद बागरेचा,प्रसाद नाईक,राजेंद्र बंब,डॉ.अजय गर्जे,डॉ.वर्षा झंवर,सुधाताई ठोळे,वकील संघाचे माजी अध्यक्ष शंतनू धोर्डे,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,माजी अध्यक्ष भरत मोरे,नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेंन बोरावके,राजेंद्र वाकचौरे,मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,डॉ.तुषार गलांडे,डॉ.अतिष काळे,सुनील शिलेदार,फकीर कुरेशी,आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या काळात चार क्रमांकाच्या तलावासाठी दोन कोटींचा निधी आणला होता मात्र त्याचे काम दुर्दैवाने करता आले नाही.मात्र सरकार बदलल्याने आता ती संधी आपल्याला मिळाली तिचे सोने केले आहे.आपणाला शहरात सर्वत्र पाण्यासाठी टाक्या ठेवलेल्या आढळत होत्या. त्या वेळीच आपण शहराला पाणी देण्याचा निश्चय केला होता.यात सर्वात महत्वाची बाब तांत्रिक मान्यता असते ती मिळाल्याने या तलावाचे काम होणार हे निश्चित होते.प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर कुठलेही काम सुरू करता येते.त्या बाबत पाच क्रमांकाचे काम सुरू होण्यात अडचण राहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यावेळी त्यांनी,” ये तो अब झ्याकि है,आगे-आगे देखो होता है क्या! हा शेर ऐकून आपले मनोगत संपवले मात्र निळवंडे धरणाचे पाणी आणणे कसे गैर होते हे सांगण्याची कटुता मुद्द्यांमहून टाळली असल्याचे दिसून आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अड.शिंदे यांनी केले तर उपस्थितांना ओमप्रकाश कोयटे,पद्माकांत कुदळे,कैलास ठोळे,डॉ.अजय गर्जे,प्रसाद नाईक,डॉ.तुषार गलांडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

सदर प्रसंगी उपस्थित विविध संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे.त्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रारंभी कोपरगाव शहरातील मुस्लिम युवकांनी दुचाकीची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्यापासून आ.काळे यांची सवाद्य प्रचार फेरी आयोजित केली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी नगरसेवक रमेश गवळी,तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close