जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

रस्ता लुटीतील ..तो आरोपी पकडला,पाच दिवस पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील रहिवाशी असलेले व जवळके येथे आपला सोनारकीचा व्यवसाय चालविणारे व्यावसायिक महेंद्र कुलकर्णी यांचा पाठलाग करून डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत सायंकाळच्या सुमारास संगमनेर रस्त्यावर अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्या कडील २ लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास करणारी टोळी पकडण्यात येवला पोलिसांना यश आले असून त्यांनी नुकतेच आरोपी निखिल विजयराव मिसाळ (वय-२४) रा.सराफ बाजार कोपरगाव, व अमोल शांताराम शिंदे (वय-२२) रा.उंदीरवाडी ता.येवला या दोघाना नुकतेच गजाआड केले आहे. त्यांना येवला पोलिसांकडून ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.कोपरगाव पोलिसानी त्यांना कोपरगाव येथील तिसरे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजार केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान आरोपी मिसाळ हा फिर्यादीचा मित्रच निघाल्याने पोलिसही चक्रावुंन गेले आहे.

दरम्यान येवला पोलिसांना या प्रकरणी एका गुन्ह्यात ते अडकल्याने योगायोगाने हि टोळी सापडली असून त्यांना पोलिसानी आपला हिसका दाखवल्यावर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्यांना नुकतेच कोपरगाव शहर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.त्यांनी त्यानंतर कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्च पर्यंत पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त से कि,कोपरगाव शहरातील तरुण महेंद्र मुरलीधर कुलकर्णी यांनी जवळके येथे १ जानेवारी १९९९ रोजी जवळके येथे ग्रामपंचायतीने आठवडे बाजार भरवल्याने तेथे व्यवसायासाठी मोठी संधी निर्माण झाल्याचे पाहून त्या ठिकाणी हनुमान मंदिरालगत एक गाळ्यात गायत्री ज्वेलर्स हे आपले दुकान थाटले होते.व्यवसायही चांगला चालत होता.मात्र काही विघ्नसंतोषी मित्रांना ते पाहवले नाही.त्यातील मुख्य आरोपी निखिल मिसाळ हा त्यांचा मित्रच त्यांच्या जीवावर उठला होता व त्यांनेच त्यांना लुटण्याचा डाव आखला होता.व येवला तालुक्यातील एका चोरट्याला हाताशी धरून महेंद्र कुलकर्णी यांना लुटण्याचा कट आखला गेला.

दरम्यान यातील प्रमुख आरोपी निखिल मिसाळ हा कोपरगाव सराफ बाजार येथील असून तो कुलकर्णी यांचा मित्रच असल्याचे उघड झाले आहे.व गुन्हा घडल्यानंतर तो तपासासाठी महेंद्र कुलकर्णी व पोलिसांच्या सोबत वावरत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

कुलकर्णी यांचा घरी कोपरगावला येण्याची वेळ ते कशाने येतात.कधी येतात.त्यांचा माल बरोबर असतो किंवा काय याचा सर्व तपशील जमा करण्यात आला.व १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी हे डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील “हॉटेल माईलस्टोन” या ठिकाणी संगमनेर रस्त्यावर निर्जन असणारी जागा त्यासाठी निवडली गेली होती.व बरोबर ठरल्या वेळी त्यांची “होंडा पॅशन प्रो” गाडीवरून सायंकाळी अंधार पडण्याची वाट पाहत थांबले होते.त्यांनी सायंकाळी बरोबर संधी साधत पाठीमागून दुसऱ्या गाडीने तिघा जणांनी पाठलाग करून त्यांची गाडीला “हॉटेल माईल स्टोन” या हॉटेलजवळील वळणावर अडवले व अज्ञात आरोपीनी त्यांना कोयता,तलवारीचा धाक दाखवून त्यांना खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील १८ हजार रुपयांची रोख रक्कम व दुकानातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने असा २ लाख ५८ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता.या प्रकरणात पोलिसानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.पोलीस या आरोपींचा शोधात होते.मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close