जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून संवत्सर ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले आहे.सरपंच सुलोचना ढेपले व उपसरपंच विवेक परजणे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सुमारे दीडशेहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

“महिलांनी आता केवळ चूल आणि मूल या जोखडामध्ये गुंतून न पडता समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपला उत्कर्ष निर्माण केला पहिजे.शासनाने विविध क्षेत्रामध्ये आरक्षण देऊन महिलांना सन्मान व संधी उपलब्ध करुन दिलेली आहे परंतु आजही कित्येक महिला या आरक्षणापासून अनभिज्ञ आहेत त्यांना या दिसपासून प्रेरणा मिळायला हवी”-सुलोचना ढेपले,सरपंच,संवत्सर ग्रामपंचायत.

संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजित केल्या गेलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात हिमोग्लोबीन,कॅल्शियम,रक्त व मधुमेह तसेच इतर आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी श्रीमती वैद्य,श्रीमती पंडीत यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली.कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल आरोग्य सेविका वनीता गंगुले व सौ. भोकरे यांचा सन्मानचिन्ह देऊन ग्रामपंचायतीच्यावतीने गौरव करण्यात आला. माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले, ग्रामविकास अधिकारी कृष्णदास आहिरे,डॉ.अनिकेत खोत यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.महिला व मुलींनी रेखाटलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शनाचेही याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते.

सरपंच सुलोचना ढेपले यांनी महिलांनी आता केवळ चूल आणि मूल या जोखडामध्ये गुंतून न पडता समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपला उत्कर्ष निर्माण केला पहिजे.शासनाने विविध क्षेत्रामध्ये आरक्षण देऊन महिलांना सन्मान व संधी उपलब्ध करुन दिलेली आहे परंतु आजही कित्येक महिला या आरक्षणापासून अनभिज्ञ आहेत.ठराविक चाकोरीच्याबाहेर येण्यास आजही कित्येक महिला धजावत नसल्याने प्रगतीपासून त्या वंचित आहेत.येणारे युग हे अतिशय वेगवान आणि आधुनिकतेने व्यापलेले असल्याने पारंपारिक विचारातून बाहेर पडून महिलांनी आता सक्षम होण्याची वेळ आलेली आहे.त्यासाठी आधुनिक काळाबरोबर धावण्याची स्पर्धा महिलांना करावी लागणार आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली संवत्सर गांवात विविध उपक्रम राबविण्यात येत असून एक आदर्श गांव म्हणून संवत्सरची ओळख निर्माण झालेली असल्याचेही सरपंच ढेपले यांनी शेवटी सांगितले आहे.

उपसरपंच विवेक परजणे यांनीही महिलादिनाचे महत्व व त्याची पार्श्वभूमी विषद केली.आपल्या अवतीभवती विविध प्रकारच्या समस्या असल्या तरी समाजाच्या हितासाठी पुढे येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढलेले दिसून येते.येणाऱ्या काळात अधिकाधिक तरुणींनी, महिलांनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे.पूर्वी स्त्रीयांच्या आरोग्याबाबत गरोदरपण,बाळंतपणातील धोके या समस्या अधिक प्रमाणात होत्या.आज या जोडीला मधुमेह,हृदयविकार ताणतणाव, रक्तदाब यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे.या समस्या निवारण करण्यासाठी सामुहीक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही श्री परजणे यांनी सांगितले.

याप्रसंगी महिला,ग्रामस्थ,शिक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतणीस,आरोग्य केंद्राच्या सेविका, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.केंद्रप्रमुख दिलीप ढेपले यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close