शैक्षणिक
यशला कष्टाशिवाय पर्याय नाही -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नुकतेच कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.तर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
वाढते प्रदूषण,हवामान बदल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे.झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ताजी हवा देतात,ज्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राहते.वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो,जमिनीची धूप थांबते,जलसंवर्धन होते आणि जैवविविधता वाढते,जे मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. हि गरज ओळखून कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे आदी प्रमुख मान्यवरासह
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्पर्धा परीक्षा विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी जगताप पुढे बोलताना म्हणाले की,” महाविद्यालयात अभ्यास करतांना आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून सातत्यपूर्वक अभ्यास म्हणजे यशस्वी जीवनाची हमी होय असेही ते शेवटी म्हणाले आहे.
यावेळी स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे.तर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
सदर वृक्षारोपण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड,डॉ.संजय दवंगे,स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके,डॉ.शैलेंद्र बनसोडे आदींनी परिश्रम घेतले तर उपस्थितांचे आभार डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी मानले आहे.