गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले इसम घनश्याम मदनलाल नागला (वय-५४) यांची १२ हजार रुपये किमतीची लाल पट्टे असलेली हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची सी.डी.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ ए. यू.९८१५) दि.०६ मार्च रोजी सायंकाळी ०७ वाजे नंतर अज्ञातच चोरट्याने चोरून नेली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी घनश्याम नागला हे वरील गावचे रहिवासी असून त्यांची वरील क्रमांकाची १२ हजार रुपये किमतीची हिरो होंडा काळ्या रंगाची दुचाकी हि अज्ञातच चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.७८/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.