जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पुणतांबा चौफुलीवर अपघात ,महिला जागीच ठार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या दक्षिणेस सुमारे अडीच कि.मी अंतरावर असलेल्या नगर-मनमाड व मुंबई-नागपूर महामार्गावरील पुणतांबा फाटा चौफुलीवर काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास हिरो होंडा सी.डी. डिलक्स या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ ए.क्यु.६३४१) हिला हरियाणा राज्यातील ट्रकने (क्रमांक एच.आर.७४ ए.७४८१) दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरून प्रवास करणारी संवत्सर येथील महिला बेबी भीमराज मैद (वय-५५) या जागीच ठार झाल्या आहेत.अपघाता नंतर ट्रकचालक फरार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी ट्रक चालक तौसिफखान सामी खान रा.राजपुर गुरगाव सोहिना गुरगाव,हरियाणा राज्य यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संवत्सर ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील मयत महिला बेबी मैद व त्यांचा मुलगा योगेश भीमराज मैद हे आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या मुलीस भेटण्यास जात असताना वरील क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हि हयगईने चालवून दुचाकीस धडक देऊन महिला बेबी मैद यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,संवत्सर ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील मयत महिला बेबी मैद व त्यांचा मुलगा योगेश भीमराज मैद हे आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या मुलीस भेटण्यास जात असताना वरील क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हि हयगईने चालवून दुचाकीस धडक देऊन महिला बेबी मैद यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.व या अपघाताची खबर न देताच आरोपी चालक फरारी झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गु.र.न.८८/२०२० भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४( अ) प्रमाणे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मांगावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close