पशुसंवर्धन विकास
…या गावात येथे पशुधन विकास केंद्र सुरु

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ व बायफ संस्था,नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे पशुधन विकास केंद्राचा शुभारंभ नुकताच संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कोकमठाण केंद्राद्वारे पंचक्रोशीतील पशुपालकांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली.या केंद्रामार्फत सॉर्टेड सिमेन,पारंपारिक सिमेन,देशी गोवंशाचे सिमेन,बायफचे खनिज मिश्रण,पशुरोग निदान प्रयोगशाळा, प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या जनावरांच्या तपासण्या करून देण्यात येणार आहे-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे तालुका सहकारी दुध संघ.
याप्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे,बायफ संस्थेच्या वरिष्ठ अधिकारी नीधी परमार,कोपरगांव बायफ कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर,श्री भगत,केंद्र संचालक जालिंदर साबळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी बायफ संस्थेचे अधिकारी सुधाकर बाबर यांनी प्रास्ताविक केले.कोकमठाण केंद्राद्वारे पंचक्रोशीतील पशुपालकांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध
सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली.या केंद्रामार्फत सॉर्टेड सिमेन,पारंपारिक सिमेन,देशी गोवंशाचे सिमेन,बायफचे खनिज मिश्रण,पशुरोग निदान प्रयोगशाळा, प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या जनावरांच्या तपासण्या अशा सर्व सुविधा गोदावरी दृध संघाच्या दूध उत्पादकांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्री बाबर यांनी सांगितले आहे.
संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुरघास बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा,बायोगॅस प्रकल्प व या प्रकल्पाद्वारे पशुपालकांना उपलब्ध होऊ शकणारी स्लरी विक्री व्यवस्था,बसलेल्या गाईंसाठी काऊ लिफ्टची सोय,नव्याने सुरु झालेला संवादिनी प्रकल्प,या प्रकल्पाद्वारे दूध उत्पादक शेतक-यांना घरबसल्या मोबाईलवर अद्ययावत तांत्रिक माहिती उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.तसेच संघाच्या कार्यस्थळावर बायफ संस्थेने सुरु केलेल्या कामधेनू योजनेअंतर्गत प्रामुख्याने सॉर्टेड सिमेन ( कृत्रिम रेतन ) कमी दरात उपलब्ध करुन देणे,पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नोंदणी करणे, नोंदणीकृत पशुपालकांना अनुदानावर ९० टक्के कालवडींची हमी असणारे सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देणे,जनावरांच्या आहारामध्ये अत्यावश्यक असलेल्या बायफ संस्थेच्या गुणवत्तापूर्ण खनिज मिश्रणाचा पुरवठा करणे,पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये जनावरांचे रक्त,लघवी,दूध,शेण व इतर तपासण्या करणे अशा विविध उपक्रमांची माहिती देऊन या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे आवाहनही परजणे यांनी केले आहे.
कोकमठाण येथे पशुधन विकास केंद्र सुरु झाल्याने परिसरातील दूध उत्पादकांना याचा चांगला लाभ होणार असून पशुधनाच्या आरोग्यासह दूध उत्पादन वाढीसाठी देखील लाभ होणार असल्याने दूध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.