जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेचे कर्मचारी सोपान शिंदे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सोपान निवृत्ती शिंदे (वय-५८) यांचे काल सकाळी सहा वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाल्याची घटना उघड झाली आहे.त्यांच्यावर त्यांच्या जवळके या गावी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन भाऊ,पत्नी, एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जवळके गावी शोककळा पसरली आहे.

स्व.सोपान शिंदे हे नगरपरिषदेत साधारण १९९४ च्या सुमारास आपले शिक्षण पूर्ण करून वसुली विभागात नोकरीस लागले होते.त्यांच्या सेवा निवृत्तीस अवघे अठरा महिने राहिले असताना हि दुर्घटना घडली आहे.ते आपल्या राहुल शिंदे या मुलास सोमवार दि.२ मार्च रोजी सकाळी कामावर जातो म्हणून सांगून जातो म्हणून गेले ते परतलेच नाही.ते ३ मार्च रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास माधवनगर कोपरगाव या ठिकाणी सकाळी प्रभात फेरीस गेलेल्या काही नागरिकांना बेशुद्ध मिळून आल्याने त्यांनी हि बाब कोपरगाव पोलिसांना कळविली होती.त्यांना नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.ते महावितरणचे सेवानिवृत्त तारतंत्री भिवराज शिंदे व निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अशोक शिंदे यांचे कनिष्ठ बंधू होते.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यू रजिस्टर नं.८/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close