जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वैजापूर रस्त्याच्या दुरावस्थेस लोकप्रतिनिधी जबाबदार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील वैजापूर रोड शिरसगांव मार्गे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला असून त्याच्या दुर्दशेस लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी कारणीभुत असल्याचा आरोप जि.प.माजी गटनेते केशवराव भवर यांनी नुकताच एका निवेदनाद्वारे केला आहे.

राज्य शासनाकडे पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील पूर्वेकडील गांवांना जोडणारा कोपरगाव वैजापूर हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे.वर्तमानात या रस्त्याची वार्इट परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यांस लवकरच पूर्वेकडील ग्रामस्थांसमवेत या रस्त्याने मोटर सायकलस्पर्धा आयोजित करुन शासनाचे लक्ष वेधले जार्इल असा र्इशाराही दिला आहे.
केशव भवर यांनी निवेदनात पुढे म्हटले की,पावसाळयानंतर सदर रस्त्यावरील एक सुद्धा खड्डा बुजवला गेला नाही. सार्इबाबा कॉर्नर ते स्टेशन व पढेगांव कॅनॉल ते कासली पर्यंत नवीन काम चालू झाले. सदरील काम मंदगतीेने चालू आहे. रोडच्या बाजुने नुसते खड्डे करुन ठेवले आहेत. स्टेशन रोडवर दुभाजक बसवले आहेत त्यावर पाणी न मारल्यामुळे ते कुचकामी ठरले आहे. कुठल्याही प्रकारची गुणवत्ता सदर रस्त्याच्या कामास नाही. त्यामुळे वहातुक सुरळीत होण्याऐवजी अडचणीची ठरत आहे. रस्त्याच्या खराबीमुळे या रस्त्याने दररोज अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. दोन जिल्हयांना जोडणारा हा रस्ता असून कोपरगांवच्या पूर्वेकडील सर्व गांवांना सदरील रोडचाच वापर करावा लागतो.. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी बेजबाबदारपणे दुरुत्तरे करीत आहेत. सदरील रोड दुरुस्ती संदर्भात शासनाने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पूर्वेकडील शिंगणापूर,करंजी, पढेगांव, कासली,शिरसगांव,सावळगांव,तिळवणी,गोधेगांव,आपेगांव,उक्कडगांव, दहिगांव बोलका ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेतील. सदर रस्त्यावर मोटर सायकल स्पर्धा लवकरात लवकर घ्यावी लागेल असे जि.प.माजी सदस्य केशव भवर यांनी निवेदनाद्वारे र्इशारा दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close