जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात बिझनेस एक्स्पो उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यावसायिकांना एकत्र येऊन त्यांना आपल्या मालासाठी व्यापारी पेठ उपलब्ध करून देण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव लायन्स क्लब ने आयोजित केलेला बिझनेस एक्सपो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमाला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.अध्यक्ष कोल्हे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कोपरगाव नगपालिका नगराध्यक्ष विजय वहाडणे, महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची बाजारपेठ तयार करण्यात आली होती यातून लाखो रुपये किमतीचे कृषी विषयक अवजारांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. तसेच शहरातील अहिंसा खादी हातमाग वस्रोद्योग आयोजित फॅशन शो व लायन्स मुकबधिर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केलेले नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. लायन्स क्लबच्या वतीने कोपरगावसह अनेक ठिकाणच्या व्यवसायीकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी अत्यल्प दरात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून या बिझनेस एस्पो मधून अल्प खर्चात खरेदी व विक्री करण्याची संधी कोपरगाव वासियांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

२० फेब्रुवारी पासून चार दिवसांच्या कालावधीमध्ये विविध संगीत, मनोरंजन व विविध कलात्मक स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धेमध्ये यशस्वी, सांघिक कामगिरी करणाऱ्या संघांना लायन्स बिझनेस एक्स्पोच्या वतीने विविध बक्षिसे आणि पारितोषिके देण्यात आले.
या प्रसंगी साईकुबेर डेव्हलपर्स आयोजित डान्स कोपरगाव डान्स स्पर्धेत सुपर स्टार प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक जय हनुमान कलामंच रायगड आणि इंडियन मार्व्हेल्स मुंबई यांना विभागून देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक “ए रिस्पेक्ट नासिक” या संघाला मिळाला तर तृतीय क्रमांक आळेफाटा येथील “कला अविष्कार” संघाने पटकाविला. तसेच कोपरगाव सुपर स्टार या सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक “टीम रॉक” डान्सने मिळविला. तर द्वितीय क्रमांक “आर क्रो डान्से ग्रुप”, तृतीय क्रमांक “संजीवनी रायझिंग स्टार्स” संघाने पटकाविला. तसेच लिटल चॅम्पस अंतर्गत लहान मुलामुलींच्या देखील सांघिक नृत्याविष्काराच्या स्पर्धा पार पडल्या यामध्ये लिटल चॅम्पस या सांघिक प्रकारात पनवेल येथील ओमकार ग्रुप, मुंबई येथील सचिन अकॅडमी, अलिबाग येथील सी प्रेरणा कलामंच यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतील क्रमांक मिळविला. तर कोपरगाव लिटल चॅम्पस या सांघिक प्रकारात कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक ग्रुप मधु डान्स अकॅडमी, स्टुडीओ एक डान्स अकॅडमी यांच्या विविध उत्कृष्ट नृत्य आविष्कारास अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतील क्रमांक मिळवला.कोपरगाव आयडॉल या स्पर्धेत सोलो डान्स प्रकारात साबा पठाण डयुट प्रकारात अनिल गिड्डे व यश कोते यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध बक्षिसे आणि पारितोषिके मिळविली आहे.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितांसह कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय शेटे, लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ सिद्धांत बागरेचा, लिओ क्लब ऑफ कोपरगाव समता (अल्फा) चे अध्यक्ष कुलदिप कोयटे, आणि लायनेस क्लबच्या अध्यक्षा लायनेस कामिनी शेटे, सर्व लायन्स राजेश ठोळे संदीप ओमप्रकाश कोयटे व सत्येन मुंदडा, संदीप रोहमारे, सुरेश शिंदे यांचेसह तिन्ही क्लबचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close