जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एक बुडाल्याची भीती व्यक्त,पोलिसांना वाचविण्यात अपयश

जाहिरात-9423439946

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून काल सायंकाळी सहाच्या सुमारास दत्त पारानजीक असलेल्या डोहात काल शहरातील गणेश बुवा नावाच्या इसमाने उडी मारून आपली जीवन संपवल्याची भीती व्यक्त होत आहे.या बाबत कोपरगाव शहर पोलिसानी रात्री उशिरापर्यंत व सकाळी शोध घेऊनही उपयोग झाला नाही.शोधात तेथे असलेल्या चिखलामुळे मोठा व्यत्यय येत होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,काल सायंकाळी सहाच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांना काही नागरिकांनी दूरध्वनी करून कोपरगाव शहरात असलेल्या दत्त पारानजीक कोर्टा शेजारी रहिवाशी असलेल्या एका इसमाने गोदावरी नदीच्या डोहात अज्ञात कारणाने उडी मारून आपली जीवनयात्रा संपावल्याची माहिती दिली त्यावेळी.त्यावेळी कोपरगाव शहर पोलिस कॉ.अंबादास वाघ, जयदीप गवारे, अनिस शेख, संभाजी शिंदे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्याठिकाणी नागरिकांचा जमाव जमलेला होता.त्यावेळी पोलिसानी आपले बचावकार्य सुरु केले असता तेथे असलेल्या चिखलामुळे मोठा व्यत्यय येत होता.नंतर शोधकार्य सुरु असताना अंधार पडल्याने पोलिसांना आपली शोध मोहीम थांबवावी लागली.आज सकाळी पोलिसानी आपली शोध मोहीम राबवली मात्र त्यांना यश आले नाही.त्यामुळे हि मोहीम पोलिसांना थांबवावी लागली.दरम्यान हा इसम वाचला कि नाही याबाबत कोणीही खात्रीलायक माहिती देऊ शकले नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close