नगर जिल्हा
राहात्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस लाखांची भरपाई द्या-कालवा कृती समिती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रत १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज लागोपाठ होणाऱ्या आत्महत्या थांबल्या असत्या,त्यामुळे सरकारने व उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी याचे दायित्व आपल्या माथी घेऊन गोगलगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाखांची मदत द्यावी अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीने नुकतीच प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान या बाबत समितीने प्रांत कार्यालयात जाऊन प्रमाताधिकारी गोविंद शिंदे,राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन आठ दिवसात या कुटुंबांना पंचवीस लाखांची मदत देण्यात यावी,अन्यथा कालवा कृती समिती आंदोलन करील असा इशारा शेवटी देण्यात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,अकोले,संगमनेर,राहाता,कोपरगाव,राहुरी,श्रीरामपूर,सिन्नर आदी तालुक्यातील १८२ गावांसाठी राज्य सरकारने १४ जुलै १९७० रोजी निळवंडे उर्फ अप्पर प्रवरा-२ हा प्रकल्प मंजूर केला होता.त्याला या जुलै महिन्यात पन्नास वर्ष होत आले आहे तरीही या प्रकल्पाचे कालवे अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही.या दरम्यान अनेकांनी आपल्या विधानसभा,लोकसभा,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणूका जिंकून आपल्या पोळ्या भाजून घेतल्या मात्र हा प्रकल्प पूर्ण केला नाही.उलट या प्रकल्पाचे कालवे कसे होणार नाही अशीच व्यवस्था निर्माण करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.परिणामस्वरूप कालवे आधी पूर्ण करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करून धरण आधी पूर्ण करून या १८२ गावातील सुमारे दहा लाख शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.त्यामुळे या पर्जन्य छायेच्या या प्रदेशात कृत्रिम दुष्काळ निर्माण करून आज या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.त्यामुळे बहादरपूर पासून सुरु झालेली हि आत्महत्यांची मालिका संपण्याची चिन्हे अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाही.
राहाता तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायत हद्दीत अशोक एकनाथ मगर (वय-३५) या शेतकऱ्यांची लागोपाठ चौथी तर राहाता तालुक्यात पाचवी आत्महत्या ठरली आहे.”राहाता हा मॉडेल मतदार संघ आहे”अशी पिपाणी वाजवून आपल्या पोळ्या भाजणाऱ्या राजकीय प्रवृत्तीस हि सणसणीत चपराक मानली जात आहे.या पूर्वी याच गावातील रवींद्र लक्ष्मण मगर,त्या पाठोपाठ बाबासाहेब महादू मगर, लक्ष्मीकांत आप्पासाहेब मगर, आणि आता अशोक एकनाथ मगर या शेतकऱ्याने आपण आत्महत्त्या करण्याचे कारण लिहून ठेवले आहे.
राहाता तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायत हद्दीत अशोक एकनाथ मगर (वय-३५) या शेतकऱ्यांची लागोपाठ चौथी तर राहाता तालुक्यात पाचवी आत्महत्या ठरली आहे.”राहाता हा मॉडेल मतदार संघ आहे”अशी पिपाणी वाजवून आपल्या पोळ्या भाजणाऱ्या राजकीय प्रवृत्तीस हि सणसणीत चपराक मानली जात आहे.या पूर्वी याच गावातील रवींद्र लक्ष्मण मगर,त्या पाठोपाठ बाबासाहेब महादू मगर, लक्ष्मीकांत आप्पासाहेब मगर, आणि आता अशोक एकनाथ मगर या शेतकऱ्याने आपण आत्महत्त्या करण्याचे कारण लिहून ठेवले आहे.त्यात तो म्हणतो,”कर्जाला कंटाळून व नापिकीला कंटाळून मी आत्महत्या करीत आहेत”त्या मूळे आता प्रशासने हि चिठ्ठी केलवड येथील शेतकऱ्यासारखी खोटी न ठरवली म्हणजे कमावली.या खेरीज केलवड येथील शेतकरी विठोबा धोंडिबा वैद्य व बहादरपूर ता.कोपरगाव येथील शेतकऱ्यांची आत्महत्या कोणाही सुज्ञ मनाला चटका लावून जाणारी आहे.मात्र तरीही आपली राजकीय व्यवस्था त्यातून पळवाट काढण्यास तत्पर असते.या सारखे दुर्दैव नाही.त्यावेळी तो शेतकरीही अडाणी होता,असे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.आता एखादा शेतकरी अडाणी असला म्हणून तो आपल्या दुःखाचे कारण व मृत्यूचे कारण दुसऱ्याकडून लिहू शकत नाही असे होऊ शकते का ? मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे राजकारण राज्याने पाहिले आहे.आपले गाव मॉडेल म्हणून घेताना उषा-पायथ्याशी असलेल्या मात्र आत्महत्यांचे आगर ठरलेल्या या गावाची दाखल अद्याप कोणालाही घ्यावीशी वाटत नाही.त्यातच या गावाच्या शेजारी देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान,केंद्रीय मंत्री,मुख्यमंत्री आदींचा कायम वावर असतो तरीही त्याची दाखल कोणालाही घ्यावी वाटली नाही.सगळेच “झापडबंद नेते” ठरले आहेत.दारुवाल्यांच्या गोंगाटात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या किंकाळ्या कोणालाही ऐकू येत नाही.या परिस दुसरे दुर्दैव नाही.
दरम्यान या बाबत राहाता येथील तहसीलदार कुंदन हिरे यांनी या कुटुंबाला तातडीची २० हजार रुपयांची मदत दिली जाईल व या कुटुंबाला अंत्योदय योजनेत समाविष्ठ करून त्यांना ३५ किलो धान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले असून दोन मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व एखाद्या समाजसेवी संस्थेला सोपविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
या बाबत निळवंडे कालव्यांचा न्यायिक व संघर्ष पातळीवर लढा देणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने याची गंभीर दाखल घेतली असून या बाबत नुकतीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन दिलासा दिला आहे.या वेळी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,जेष्ठ कार्यकर्ते नानासाहेब गाढवे,विठ्ठलराव पोकळे, अड्.योगेश खालकर,वाल्मिक भडांगे,शिवाजी गायकर आदी कार्यकर्ते हजर होते.