कोपरगाव तालुका
खोटा धनादेश दिल्याने,एकास तीन महिन्याच्या कारावास

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्या नजीक असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेकडून आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांचा धनादेश देऊन तो न वटल्याने संस्थेने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात गुन्हा शाबीत झाल्याने कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे.एम.पांचाळ यांनी आरोपी मनोज बाबासाहेब इंगळे यांना तीन महिने कारावास व संस्थेस २ लाख वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्याने नाठाळ कर्जदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर नूतच निकाल जाहीर केला असून त्यात त्यांनी आरोपी मनोज इंगळे यांना तीन महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.शिवाय फिर्यादी संस्थेला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.या शिवाय नुकसान भरपाई देण्यात हयगय केल्यास आणखी दहा दिवसाचा कारावास देण्याचे फर्मान काढले आहे.या खटल्यात ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने अड्.एस.डी. काटकर यांनी काम पाहिले. या आदेशाने संस्थेचे कर्ज घेऊन ते न देण्याऱ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.