गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकाचे निधन,अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले तरुण प्रतीक चंद्रकांत भारूड (वय-२८) या तरुणांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले आहे.त्यास शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
त्या बाबत शिर्डी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ( क्रं.००/२२) अन्वये नोंद करण्यात येऊन त्या बाबत अहवाल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.हि घटना दि.०५ जानेवारी रोजी घडली होती.मात्र त्यात मृत्यूचे कारण दर्शवलेले नाही.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू क्रं.०३/२०२२ अन्वये सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.