कोपरगाव तालुका
कोपरगावात संपले अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे राजकारण !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतातच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्राच्या भूमीत भूकबळी गेलेला आहे.हा महाराष्ट्रावरील कलंक आहे मात्र कोपरगावातील समाज शांतताप्रिय असल्याचे कौतुक कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२०-१८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते,सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.मात्र कोपरगाव शहरात केवळ श्रेयवादावरून या पुतळ्याचे अनावरण टाळले जात होते मात्र आटा आता हा अंतिम निर्णय जाहीर झाला आहे.हे विशेष!
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नियोजन बैठक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव,अड.नितीन पोळ,कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,विनोद राक्षे, माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के,नितीन साबळे,शरद त्रिभुवन,जयवंत मरसाळे,राजेंद्र बागुल,शंकर बिऱ्हाडे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,ज्या अण्णाभाऊंच्या विचारापासून अनेकांनी प्रेरणा घेतली अनेक पदव्या मिळवल्या मात्र त्यांच्या विचाराचे अनुकरण केले जात नाही हे दुर्दैवी आहे.कोपरगाव शहरातील मातंग समाज हा शांतता प्रिय असून त्यांनी नेहमी चांगल्या विचारला साथ दिली आहे.आज समाजाने एकमुखाने आणभाऊंचा पुतळा आणण्याचा विचार केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.व तुम्ही वंचितासाठी आपले आयुष्य खर्ची केले पाहिजे तीच त्यांना आदरांजली ठरेल.व तुम्ही कोणत्याही विचार धारेबरोबर राहा पण समाजाचे ऋण विसरू नका व येणाऱ्या पुतळ्याचे गावाच्या शिवेवर वाजतगाजत स्वागत करू असे आश्वासन देऊन सोहळा शांततेत साजरा करावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.तर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत आपण शहरातील सर्व पुतळ्यांच्या परिसरात चलचित्रण करण्याची व्यवस्था करण्याचा ठराव घेणार असल्याचे जाहीर केले आहे.त्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले तर उपस्थितांना तहसीलदार विजय बोरुडे ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे तर विनोद राक्षे,राजेंद्र बागुल,सुखदेव जाधव,अड.नितीन पोळ आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी मुख्याधिकारी गोसावी यांनी उपस्थितांना तारीख जाहीर करण्याचे आवाहन केले त्यावेळी सर्वांनी एक मताने पुतळा रविवारी आणण्याचे जाहीर केले त्याचे सर्वांनी टाळ्यांच्या व अण्णाभाऊंच्या घोषणांच्या गजरात स्वागत केले तर उपस्थितांचे आभार तहसीलदार नितीन साबळे यांनी मानले आहे.