जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण पुरवा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचे प्रेरणादायी पुतळे बसविण्यात आले आहे मात्र त्यांची सुरक्षा रामभरोसे आहे.त्या पुतळ्यांना असामाजिक तत्वांची भीती असून यावर उपाय म्हणून या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे व त्या परिसरात चलचित्रण करणारे कॅमेरे बसवावे अशी मागणी कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेने नुकतीच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.

कोपरगाव तहसील कचेरीत आज लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरण करण्याची पूर्वतयारी करण्याची तातडीची बैठक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार विजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.त्या ठिकाणी नगराध्यक्ष वहाडणे यांनी,” आगामी काळात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर निर्णय घेण्यात येणार असल्या”ची घोषणा केली आहे.त्याचे शिवसेनेसह उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली.ती दि.१६ डिसेंबरला ही घटना घडली आहे.यानंतर बेळगावमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. बेळगावात सोमवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ०६ पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा या निषेध व्यक्त केला असला तरी या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहे.कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेने या प्रकरणी आपली भूमिका जाहीर केली असून या घटनेचा आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आगामी काळात दक्षता घेण्यासाठी सावधगिरी घेण्याचे ठरवलेलं आहे.त्यामुळे आज शिवसेनेचे अध्यक्ष कलविंदर दडियाल व तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी आज तहसीलदार यांची व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,बेळगाव येथील घटना निंदनीय आहे.त्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.मात्र गामी काळात अशाच घटनांची पुनरावृत्ती असामाजिक तत्वांकडून नाकारता येत नाही.त्यासाठी सावध राहण्याची गरज आहे.त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यासाठी पुतळ्याच्या जागी दिवसाचे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे.त्या साठी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक व चलचित्रण करणारी व्यवस्था निर्मांण करावी अशी मागणी केली आहे.सदर प्रसंगी निवेदन तहसीलदार विजय बोरुडे,कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी विशाल झावरे,विकास शर्मा,जाफर् पठाण अविनाश धोक्रट,प्रफुल्ल शिंगाडे,किरण लोणारी,मंगेश देशमुख,संतोष भालेराव,प्रवीण पवार,भूषण वंडांगळे,वैभव गीते,मधू पवार,सतिष शिंगाडे,गणेश बारवंटकर,गोविंद चव्हाण,रफिक शेख,गिरीश गुरली आदी मान्यवरांसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close