जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्यातील गुन्हेगार आठ वर्षांनी जेरबंद,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दरोड्यातील तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेला आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले असून आणखी काही आरोपी अटक केले आहे.त्यामुळे गंभीर गुन्हे करून फरार होवून पोलिसांना वाकुल्या दाखविणाऱ्या गुन्हेगारांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील अवैध व्यवसाया रणशिंग फुंकून त्या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नसताना.त्यानंतरच्या अवैध व्यवसाया विरोधात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकच अडकले असल्याने त्यांची पंचाईत झाल्याने,’आ बैल मुझे मार’अशी स्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.त्यानंतरच्या अवैध व्यवसाया विरोधात केलेल्या कारवाईत काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकच अडकले असल्याने त्यांची पंचाईत झाल्याने,’आ बैल मुझे मार’अशी स्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात फरार असलेले आरोपी अटक करण्याचे फर्मान नुकतेच काढले होते.त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस सतर्क झाले आहे.व त्यांनी सावध होऊन गुन्हे करून फरार होणाऱ्या गुन्हेगारांवर आपली करडी नजर रोखली असून या कानकापू दरोडेखोरांवर आपले लक्ष केंद्रित केले होते.त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील त्यामुळे पोलीस अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी कारवाई सुरु केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्यात त्यांनी केलेल्या कारवाईत आठ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्हयात (क्रं.१३/२०१६)सहभागी असलेला आरोपी रोहिदास सहादू बर्डे (वय-३२) रा.हिंगणी यास शोध घेऊन जेरबंद केले आहे.

दरम्यान अजामीनपात्र १७ गुंह्यातील आरोपीना वॉरंट बजावणी करण्यात आली आहे.दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांना आपला खबऱ्या मार्फत सुरेगाव शिवारात काही तरुण अवैध दारू निर्मिती करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत अवैध गावठी दारू निर्मिती करण्याच्या गुंह्यातील आरोपीवर छापा टाकून पप्पू ओपीन पिंगळे रा.मोतीनगर सुरेगाव यास अटक करून त्याने निर्माण केलेली ४० हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू व अन्य रसायन जप्त केले आहे.त्याचे विरुद्ध गुन्हा क्रं.३१३/२०२३ मुंबई प्रो.ऍक्ट कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यामूळे आगामी काळात गुन्हे कमी होतील अशी आशा नागरिकांना वाटत आहे.

दरम्यान या मोहिमेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढेकर,सुरेश गागरे,पो.हे.कॉ.संदीप बोटे,निजाम शेख,पो.कॉ.अंबादास वाघ,रशीद शेख,युवराज खुळे,चंद्रकांत मेढे आदींनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close