कोपरगाव तालुका
स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढवा-आ. काळेंची मागणी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव,राहाता तालुक्यातून पेरूच्या कलमांची मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पेरू,डाळींब,चिक्कू आदी फळांची कलमे वेळेत मिळावी.जलसंधारण च्या कामासाठी नाला खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामांसाठी शासनाकडून निधी मिळावा.शेती उपयोगी अवजारे व ट्रॅक्टर,कांदा चाळ,शेततळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून त्या प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी नुकतीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्याच्या खरिपाचा आढावा घेतला. यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा खरीप आढावा घेतांना त्यांनी हि मागणी करून पालकमंत्र्यांचे अनेक बाबींकडे लक्ष वेधले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या समवेत खरीप आढावा बैठक घेतली.त्यावेळी पाच महसूल मंडलापैकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र सुरू असल्याची माहिती समोर आली.स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या कमी असल्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडलेला नसतो त्या ठिकाणी स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे अटवृष्टीची अचूक आकडेवारी त्या स्वयंचलीत हवामान केंद्रात नोंदविली जात नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात नुकसान होऊन नुकसानीची मदत मिळण्यासाठी पात्र असतांना देखील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचे आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी करण्यात आली.नेमके या टाळेबंदी काळातच द्राक्ष,चिक्कू आदी फळांचा काढणीचा हंगाम आला असतांना या फळांच्या खरेदीसाठी फळ उत्पादकांना खरेदीदार मिळाले नाही. ज्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष,चिक्कू आदी फळ खरेदी केले ते अत्यंत अल्प दरात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या फळउत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी.शेतकऱ्यांना २०१९-२० चे ठिबक अनुदान द्यावे व २०२०-२१ साठी ठिबक ऑनलाइन प्रणाली सुरु करावी.प्रत्येक शेतकऱ्याला महाबीज कडून बियाणे मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ऐनवेळी दुसरीकडून बियाणे घ्यावे लागते त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी महाबीजकडे बियाणे मागणी केली आहे अशा सर्वच शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणे मिळावे आदी मागण्या आ.काळे यांनी पालकमंत्र्यांकडे केल्या आहेत.