जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सरात अवैध वाळू चोरी,दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध असूनही संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मनाई वस्ती भागात आरोपी रुपेश थोरात व संदीप थोरात या दोघांनी आपल्या फायद्यासाठी आपल्या विना क्रमांकाची झेनॉन गाडीत एक ब्रास वाळू भरून ती पळवून नेत असताना कामगार तलाठी संदीप प्रदीप लहाने यांनी त्यास भाऊलाल यांचे विट भट्टीजवळ आढळल्याने त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.

सदर चे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातलेला असतानाही वाळूचोर वाळूला प्रचंड भाव मिळत असल्याने वाळूचोरी करताना थांबताना दिसत नाही.त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने महसूल पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकून वाळू चोरांना चाप लावण्याचे काम सुरु ठेवले आहे.वाळू चोरी प्रतिबंधक पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार त्यांनी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला असता त्यानां झेनॉन गाडीत एक ब्रास वाळू अवैध मार्गाने भरून जात असताना आढळली त्यांनी ते वाहन ताब्यात घेऊन त्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२८/२०२०,भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपी रुपेश थोरात व संदीप थोरात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close