नगर जिल्हा
कोकमठाण येथे परिवहन महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलात राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाच्या वतीने ५६ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापक माधव काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा मालिक ध्यानपीठाचे स्थायी समीतीचे अध्यक्ष परमानंद महाराज हे राहणार आहेत.या कार्यक्रमास कुस्तीत दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, मिसाईल रेजिमेंटचे नायक दिपचंद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरीही या कार्यक्रमास क्रीडाप्रेमी नागरिकांनी बहू संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.